- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत सी-६० जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला.मात्र,कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचे मंगळवारी ११ फेब्रुवारीला निधन झाले. नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करतांना वीरगती प्राप्त झालेले सी-६० कमांडो महेश नागुलवार यांच्यावर काल बुधवार १२ फेब्रुवारीला त्यांच्या गावी अनखोडा (ता.चामोर्शी) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.सदरची घटना ताजी असतांनाच एका ३४ वर्षीय जवानाचा नक्षलविरोधी अभियानावर पथकासह जात असतांना वाटेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल,बुधवारी १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.रवीश मधुमटके रा.गडचिरोली असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.
माहितीनुसार,काल बुधवारी भामरागड तालुक्यात नक्षलविरोधी अभियानाकरिता रोड ओपनिंग करण्यासाठी आपल्या पथकासह ते रवाना झाले. दरम्यान कोठी पोलिस मदत केंद्रापासून पाच किलोमीटर अंतर चालल्यानंतर रवीश यांना अस्वस्थ वाटू लागले.त्यांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र,डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
- Advertisement -

