Monday, August 31, 2026
Homeनागपूरतुरीच्या शेंगा तोडत असतांना वाघाचा हल्ला; महिला ठार..

तुरीच्या शेंगा तोडत असतांना वाघाचा हल्ला; महिला ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शेतावर तुरीच्या शेंगा तोडत असतांना एका ४२ वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील पिपरिया परिसरातील वनविभागाच्या कॉलनीजवळ पवनी बफर झोनमधील कक्ष क्रमांक-२५४ मध्ये काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. संगीता गोपीचंद वघारे वय ४२ वर्षे, रा.नयाकुंड, ता.पारशिवनी,जि.नागपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव असून त्या पिपरिया गावनजीक असलेल्या फार्महाऊसवर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून पती व तीन मुलींसह वास्तव्यास होत्या.
संगीता वघारे ह्या काल मंगळवारी एकट्याच शेतशिवारात तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. तुरीच्या शेंगा तोडत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला करून दूरवर फरफटत नेले.बाजूच्या शेतात काही महिला कामाला गेल्या होत्या.संगीता यांची ओळख असल्याने त्यांनी शेतातून परततांना आवाज दिला.परंतु,प्रतिसाद न मिळाल्याने त्या महिलांनी त्यांच्या मुलीला विचारले.तिने आई शेतात तुरीच्या शेंगा तोडत असल्याचे सांगितले. अश्यातच मुलीने आईला बऱ्याचदा हाक मारली. परंतु, कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी संगीताचा शोध सुरू केला.काही अंतरावर पाहतात तो काय, संगीताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.आईचा मृतदेह पाहून मुलींनी एकच हंबरडा फोडला.घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी करून घटनेची माहिती तात्काळ वन विभागास देण्यात आली.रात्री पर्यंत पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.अचानक घडलेल्या घटनेने तिन्ही मुली आईविना पोरक्या झाल्या असून कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!