Friday, May 1, 2026
Homeब्रम्हपुरीतुम्ही दोन उपमुख्यमंत्री तर आम्ही दोन उपसरपंच का नाही..? ब्रह्मपुरी सरपंच संघटनेनी...

तुम्ही दोन उपमुख्यमंत्री तर आम्ही दोन उपसरपंच का नाही..? ब्रह्मपुरी सरपंच संघटनेनी केली निवेदनाद्वारे मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रह्मपुरी :- राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन सत्तांतर झाले होते.त्यात नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे पद होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यामुळे हल्ली राज्यात दोन उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत.त्याच धर्तीवर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दोन उपसरपंच पद निर्माण करण्यात यावे; याबाबतचे निवेदन ब्रह्मपुरी येथील सरपंच संघटनेने भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे

भारतीय संविधानानुसार लोकशाही व्यवस्थेत लोकसभा,राज्यसभा तर राज्यात विधानसभा व विधानपरिषद या सभागृहातून राज्याचा चालवला जातो.ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावखेड्याचा विकासात्मक कारभार केला जातो. त्याकरिता ग्रामपंचायतमध्ये दर पाच वर्षांत निवडणुका घेऊन सरपंच,उपसरपंच यांची निवड करून विकासात्मक कारभार चालवला जातो. राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्याचा कारभार चालविण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांच्या नियंत्रणात मंत्रिमंडळ व उपमुख्यमंत्री पद निर्माण करण्यात आले होते.त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कारभार चालवीत होते.मात्र नुकतेच शिंदे फडणवीस सरकार असतांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने अजित पवार ते सरकारमध्ये सामील झाले.याच धर्तीवर ग्रामपंचायती मध्ये सुध्दा दोन उपसरपंच पद निर्माण करावे; अशी मागणी सरपंच संघटनेंनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!