Friday, October 9, 2026
Homeचंद्रपूरतस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि ‘रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’ अर्थात ‘रॉ’ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष वन्यजीव रुग्णवाहिकेद्वारे तब्बल आठशे किलोमीटरहून अधिक प्रवास करून या कासवांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुरक्षित पोहोचवले.वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक विश्रांतीनंतर त्यांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली.यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील पळसगाव,ताडोबा, पांढरपवणी आणि जामणी येथे सोडण्यात आले.या पुनर्वसन मोहिमेत कासवांना केवळ जंगलात सोडण्यापुरती प्रक्रिया मर्यादित ठेवण्यात आलेली नाही.तर भविष्यात या प्रजातीची नैसर्गिकरित्या वाढ होऊन टिकाऊ लोकसंख्या निर्माण व्हावी,यासाठी नर आणि मादी कासवांच्या प्रमाणाचाही विचार करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,ही कासवे मुंबई आणि ठाणे परिसरातील अवैध वन्यजीव तस्करीविरोधी कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली होती.पुनर्वसन मोहिमेसोबतच महाराष्ट्रात ‘प्रोजेक्ट स्ट्राइप्स'(Project STRIPES)या विशेष उपक्रमाचा प्रारंभ झाला आहे. भारतीय तारांकित कासवांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते.अशा पार्श्वभूमीवर जप्त वन्यप्राण्यांची केवळ देखभाल न करता त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने पुनर्वसन करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात परतविण्याच्या दृष्टीने ‘प्रोजेक्ट स्ट्राइप्स’ महत्त्वाचा ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!