उद्रेक न्युज वृत्त
नवी दिल्ली :- संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या संकल्पनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये एक समिती स्थापन केली होती.यासाठी भाजपा सरकारने एक समिती नेमली होती.माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल तयार झाला आहे.पुढील आठवड्यात हा अहवाल,कायदा आणि न्याय मंत्रालय आणि उच्चस्तरीय समितीला सादर केला जाणार आहे. उच्चस्तरीय समितीचे प्रमुख माजी राष्ट्रपती कोविंद यांनी बुधवारी दिल्लीत समितीतील सदस्यांसोबत चर्चा केली होती; असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान पुढील आठवड्यात यावर निर्णय होवू शकतो.
काँग्रेसपाठोपाठ आम आदमी पक्षाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला विरोध दर्शविला आहे.यासंदर्भात आपले मत उच्चस्तरीय समितीकडे विचारार्थ पाठवले आहे. आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी उच्चस्तरीय समितीचे सचिव नितेन चंद्रा यांना पत्र लिहिलेल्या पत्रात संसदीय लोकशाहीची कल्पना, राज्यघटनेची मूलभूत रचना आणि देशाच्या संघराज्यीय राजकारणाला हानी पोहोचेल, असे म्हटले आहे.

