- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विदर्भात तीन दिवसांपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाने आज,बुधवार ९ जुलैच्या सायंकाळी थोडी उसंत घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र,तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.अश्यातच पुरामुळे अनेक मार्ग बंद पडू लागले.आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल २२ मार्ग पुरामुळे बंद पडली आहेत.
- पुरामुळे बंद पडलेले मार्ग👇
१.गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (पाल नदी,कोलांडी नाला,गाढवी नदी)
२.गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (गोविदपुर नाला,शिवणी नाला)
३. कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग ३७७ तालुका आरमोरी/कुरखेडा
४. अहेरी वटरा बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला) तालुका अहेरी
५. मांगदा ते कलकुली प्रजिमा ५० तालुका आरमोरी
६. कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा ७ ता.कुरखेडा (लोकल नाला)
७. चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा ३६ तालुका आरमोरी
८. शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा १ तालुका देसाईगंज
९. आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा ४९ तालुका देसाईगंज
१०. वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा ८ तालुका आरमोरी
११. चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा ५३ तालुका चामोर्शी
१२. अरसोडा-कोंढाळा-कुरूड-वडसा रस्ता प्रजिमा ४७ तालुका देसाईगंज
१३. भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा १७ (हळदीमाल नाला,अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
१४. शिवणी-चंदागड -शिरपूर रस्ता प्रजिमा ३५ तालुका कुरखेडा
१५. अमिर्झा मौशिखांब रस्ता प्रजिमा ५७ तालुका गडचिरोली
१६. वडसा वळण मार्ग प्रजिमा ४१ तालुका देसाईगंज
१७. आरमोरी-जोगीसाखरा शंकरनगर रस्ता प्रजिमा ४८ तालुका आरमोरी (गाढवी नदी)
१८. चामोर्शी मार्कंडादेव रस्ता प्रजिमा ३७ तालुका चामोर्शी
१९.खरपुंडी-दिभना-बोदली रस्ता प्रजिमा ४४ तालुका गडचिरोली
२०. वडसा-नैनपुर-कोकडी रस्ता प्रजिमा ३२ तालुका देसाईगंज
२१. आरमोरी-अरसोडा रस्ता प्रजिमा- ४७ तालुका आरमोरी
२२. वेलतूर ते एकोडी रस्ता प्रजिमा,५५ तालुका चामोर्शी
- Advertisement -

