Tuesday, May 26, 2026
Homeमुंबईतब्बल १ लाख दिव्यांगांना होणार मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक साधनांचे वितरण..

तब्बल १ लाख दिव्यांगांना होणार मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक साधनांचे वितरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा मिळवून देण्याकरिता शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत.समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येय आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व रतननिधी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक साधन वितरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.या उपक्रमाद्वारे १ लाख दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून,हा अभिनव प्रकल्प दिव्यांग पुनर्वसनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यासाठी अधिक प्रभावी कार्यवाही केली जात आहे.या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे,त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करणे हा आहे.कृत्रिम हात,पाय, श्रवणयंत्रे,व्हीलचेअर्स आणि इतर सहाय्यक उपकरणे यांचा समावेश असलेला हा वितरण कार्यक्रम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे.रतननिधी फाऊंडेशनने राज्यातील बीड,चंद्रपूर,जळगाव,सोलापूर, पालघर,मुंबई,गडचिरोली,पुणे,सातारा,कोल्हापूर, रायगड,लातूर,नांदेड,यवतमाळ,अकोला,परभणी,छत्रपती संभाजीनगर,धाराशिव आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये २९ हजार ४९६ सहाय्यक साधनांचे(जयपूर फूट,पोलिओ कॅलिपर्स,कृत्रिम हात व काठी)वितरण करून सुमारे २६ हजार दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर सुमारे १५ टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे,तर भारतात हा आकडा सुमारे २.२ टक्के आहे.या पार्श्वभूमीवर रतननिधी फाऊंडेशनचा मोबिलिटी प्रकल्प दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्याची उर्मी देणारा आत्मविश्वास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर...

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!