Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयेत्या मंगळवारी निवडणूक असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये अधिकृत सुट्टी जाहीर..

येत्या मंगळवारी निवडणूक असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये अधिकृत सुट्टी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगर पंचायतीमध्ये येत्या,मंगळवार २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा,यासाठी २ डिसेंबरला अधिकृत सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.निवडणूक असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये सदरचा आदेश लागू राहणार आहे.मतदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय मतदान करता यावे,यासाठी सरकारने ही महत्त्वाची घोषणा केली आहे.शुक्रवारी जारी झालेल्या शासकीय निर्णयानुसार,ज्या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी मतदान होईल,त्या ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांना सवेतन सुट्टीचा हक्क प्राप्त असेल.मागील निवडणुकांत काही विभागांनी सवेतन सुट्टी न दिल्याने अनेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले होते. जनप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ नुसार मतदानाच्या दिवशी सवेतन सुट्टी देणे बंधनकारक आहे,याचीही आठवण सरकारी आदेशात करून देण्यात आली आहे.मतदान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व श्रमिक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हा नियम लागू होणार आहे,मग त्यांचे कार्यस्थळ मतदान क्षेत्रात असो वा बाहेर असो.उद्योग,हॉटेल,दुकाने,आयटी कंपन्या,मॉल,किरकोळ व्यवसाय यांसह श्रम विभागाच्या अखत्यारीतील सर्व प्रतिष्ठानांनी या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. जर कोणत्या संस्थेला दिवसभर सुट्टी देणे शक्य नसेल तर किमान २ ते ३ तासांची खास सुट्टी देणे बंधनकारक असेल.नियमांचे पालन न केल्यास संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात येईल,असा इशारा सरकारने दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!