Wednesday, October 14, 2026
Homeनागपूरडॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त करणाऱ्या शासनाच्या विरोधात यल्गार 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त करणाऱ्या शासनाच्या विरोधात यल्गार 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- अंबाझरी येथील २० एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी गेल्या ६० वर्षापासून आरक्षित असलेली जमीन महाविकास आघाडी सरकार आणि आताची शिंदे,भाजप सरकारने खाजगी कंपनीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकली.खाजगी कंपनीने ताबा मिळताच ह्या आरक्षित जमिनीवरचे नागपूर महानगर पालिकेच्या मालकीचे डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन पूर्णतः उध्वस्त केले असल्याने झालेल्या अन्यायाच्या आणि दडपशाहीच्या विरुद्ध संपूर्ण आंबेडकरी समाज,दलित,मागासवर्गीय, संविधान प्रेमी नागरिक पेटून उठले आहेत. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृती समितीच्या वतीने जन आंदोलन मागील 3 महिन्यापासून सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयावर स्मारक उध्वस्त करणाऱ्या गुंड कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश जिल्हाधकारी नागपूर यांचे आदेश असतांनाही FIR कां दाखल केली नाही ? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या गुन्हेगारांना पाठीशी कां घालत आहे.या मागणीसाठी व जाब विचाण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

सर्व जागृत नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वीे केला.मोर्चाचे नेतृत्व सामूहिक होते.मुख्य संयोजक किशोर गजभिये माजी सनदी अधिकारी यांच्या नेतृत्वात एम.टी.डी.सी.चे प्रमुख नागपूर विभागाचे कांबळे यांना भेटून निवेदन देण्यात आले व त्यांना कळवण्यात आले की संबंधित विभागाचे सचिव यांचे हमीपत्र पत्र आम्हाला लेखी पाहिजे.दिवसभर आंदोलन केल्यावर सुध्दा शासन प्रशासन अधिकारी ऐकत नसल्याने आंदोलनाने उग्र रूप धारण करून रात्र भर ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेवून आंदोलन एम.टी.डी.सी.कार्यालयातच सुरू राहिले. शासन,प्रशासन,अधिकारी यांना नमावे लागले.लगेच रात्री १० वाजता मुख्य सचिव महाराष्ट्र यांचा फॅक्स विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांच्या नावे आला आणि सात दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिल्याने  आंदोलनाची सांगता करण्यात आली. आंदोलनात आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!