Sunday, May 31, 2026
Homeब्रम्हपुरीट्रॅक्टरच्या इंजिनला बांधून मजुराला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल- महिलेकडे बघितले असल्याचा प्रकार-...

ट्रॅक्टरच्या इंजिनला बांधून मजुराला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल- महिलेकडे बघितले असल्याचा प्रकार- ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रम्हपुरी :- बीड जिल्ह्यातील एका मजुराला गावातील महीलेकडे बघितले म्हणून ट्रॅक्टरच्या इंजिनला मोठ्या दोर खंडाने बांधून अमानवीय मारहाण केल्या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव येथील नळ पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट भागवत जगताप रा. श्रृंगारवाडी जिल्हा-बीड यांच्याकडे असून त्यांच्याच कामावर सदर मजुर बेलगाव येथे काम करीत आहे. कामावरील मजुराने गावातील एका महिलेकडे बघितल्याने काही नागरिकांनी व बेलगाव येथील दिनेश काशिनाथ अवसरे,निलेश काशिनाथ अवसरे, गणेश काशिनाथ अवसरे यांचा समावेश होता. मजुराला चामड्याच्या बेल्टने अमानवीय मारहाण करण्यात आली. तर एका जवळ धारदार कोयता होता.सदर प्रकरणाची माहिती ब्रम्हपुरी पोलीसांना देण्यात आली.मात्र कुणीही तक्रार करण्यास तयार नसल्याचे पोलीस निरीक्षक आंबोरे यांच्याकडून माहिती देण्यात आली.सदर प्रकरण सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होताच प्रशासन खळबळून जागे झाले.कंत्राटदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविताच बेलगाव येथील दिनेश काशिनाथ अवसरे,निलेश काशिनाथ अवसरे,गणेश काशिनाथ अवसरे यांच्यावर कलम ३९४, ३४२,३५२, ३२३,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!