Saturday, September 5, 2026
Homeकुरखेडाट्रॅक्टर व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक; दोघे ठार तर एकजण जखमी.. -...

ट्रॅक्टर व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक; दोघे ठार तर एकजण जखमी.. – कुरखेडा तालुक्यातील आजची घटना; ठार झालेल्यात एकजण आरमोरी तालुक्यातील..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या उराडी गावा नजिक असलेल्या कुथे पाटील हायस्कूल जवळ  ट्रॅक्टर व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन घटनास्थळावरच दोघे ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार १४ नोव्हेंबरच्या सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
ट्रॅक्टर चालक रोहीत नरोटे वय ३० वर्षे रा.तूलतूली ता. आरमोरी व दुचाकीस्वार महेंद्र दूगा वय ३० रा. काकडयेली (दूधमाळा) ता.धानोरा असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
प्रत्यक्षदर्शिंच्या माहितीनुसार,गौण खनिजाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक-एमएच ३३ एफ ३२८० याने ट्रॅक्टर चालक रोहीत नरोटे नजीकच्या सोंसरी डोंगर पहाडिवरील दगड(गौण खनिज)वाहतूक करून जात होता.तर विरुद्ध दिशेने दुचाकीने दोघेजण येत असतांना दुचाकी क्रमांक-एमएच ३३ वाय ५४५३ यांची समोरासमोर जोरदार धडक बसली.धडक बसताच ट्रॅक्टर पलटी होत असतांना रोहीत नरोटे हा ट्रॅक्टर इंजन वरुन उडी मारायला गेला.उडी मारत असतांना ट्राली मधील मोठे दगड ट्रॅक्टर चालकाला लागल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यु झाला तर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचाही जागीच मृत्यु झाला.तर यात दुचाकीवरील एकजण जखमी झाला.मात्र,जखमी इसमाचे नाव कळू शकले नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!