Sunday, September 6, 2026
Homeभंडाराट्रॅक्टर डोझरने घेतला तरुणाचा बळी; वडील गंभीर जखमी..

ट्रॅक्टर डोझरने घेतला तरुणाचा बळी; वडील गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली(बु.) येथील आंबेडकर चौक परिसरात वळण घेणाऱ्या एका ट्रॅक्टर डोझरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला,तर पाठीमागे बसलेले वडील गंभीर जखमी झाल्याची घटना काल शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.शंकर मुखरन बावनकुळे वय २९ वर्षे,रा.इटाण, ता.लाखांदूर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर त्याचे वडील मुखरन बावनकुळे गंभीर जखमी झाले.शंकर व त्याचे वडील मुखरन हे दोघेही दुचाकीने भेंडाळा येथील नातेवाइकांच्या घरी मयतीसाठी जात होते.सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान ते विरली(बु.)गावातील आंबेडकर चौकातून जात असतांनाच इटाण गावाच्या दिशेने वळण घेणाऱ्या एका ट्रॅक्टर डोझरने त्यांच्या दुचाकीला जोरदार दिली.धडक इतकी भीषण होती की,यात दुचाकीचा चक्काचूर झाली आणि डोझरचा लोखंडी रोडरही वाकला.यात शंकरचा याचा जागीच मृत्यू झाला,तर त्याचे वडील मुखरन गंभीर जखमी झाले.अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.गर्दी होताच चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला. नागरिकांनी तातडीने दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.डॉक्टरांनी तपासणीअंती शंकरला मृत घोषित केले.घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान,घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली.माहिती मिळताच लाखांदूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन पवार पथकासह घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करीत तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेने परिसरात शोककळा पसरली,मात्र आई-वडिलांनी अपघातात एकुलत्या एक मुलास खोवल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!