Friday, October 9, 2026
Homeदेसाईगंजट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जखमी.. - कोंढाळा येथील युवकाचा पाय मोडला..

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जखमी.. – कोंढाळा येथील युवकाचा पाय मोडला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील दुचाकीस्वार युवकास ट्रकने धडक देत ट्रॅकचा चाक पायावरून गेल्याने घडलेल्या अपघातात युवकाचा उजवा पाय मोडला असल्याची घटना आज,शुक्रवारी १३ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.विक्की रमेश झिलपे वय २८ वर्षे रा.कोंढाळा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,विक्की झिलपे हे दुचाकीने आपल्या स्वगावाहून सायंकाळच्या सुमारास देसाईगंजला काही कामानिमित्त जाण्यास निघाले होते.अशातच कोंढाळा-देसाईगंज मार्गावरील कुरुड फाट्या नजिक देसाईगंजवरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली.यात विक्की झिलपे हे दुचाकीसह रस्त्यावर पडले.रस्त्यावर पडताच ट्रॅकचा चाक पायावरून गेल्याने उजव्या पायाची हड्डी मोडून काहीसा भाग लटकलेल्या अवस्थेत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.घटना घडताच ट्रकने घटनास्थळावरून पोबारा केला.घटनेची माहिती देसाईगंज पोलीस ठाण्यास देण्यात आली.त्यानुसार पोलिसांनी आरमोरी पोलिसांशी संपर्क साधून
ट्रकला आरमोरी शहरात पकडून ठाण्यात जमा केले आहे.विक्की झिलपे यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पाया व्यतिरिक्त कुठेही मार न लागल्याने प्रकृती स्थिर आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!