उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा,सर्व परीक्षा मंडळे,सर्व माध्यमांच्या अनुदानित,विनाअनुदानित,कायम विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते पाचवी,सहावी ते आठवी या वर्गांवरील शिक्षणसेवक यांना शिक्षक या पदावर नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा)परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे.त्यामुळे आता सर्वांनाच ‘टीईटी’ परीक्षा द्यावी लागणार आहे.मात्र,ज्या शिक्षकांचे वय ५२ वर्षांपेक्षा जास्त आहे,अश्यांना परीक्षेतून वगळण्यात आले आहे. अश्यातच ५२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्वच शिक्षकांना आता ‘टीईटी’ परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘टीईटी’ परीक्षा द्यावी लागणार आहे.दोन वर्षांत परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे,अन्यथा सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालात म्हटले आहे.परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रवेश शुल्क भरण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबर पासून सुरू होऊन ३ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे.१० ते २३ नोव्हेंबर दरम्यान प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.पेपर एक २३ नोव्हेंबरला सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजे पर्यंत,तर पेपर दोन दुपारी २.३० ते सायंकाळी ५,या वेळेत होणार आहे.याबाबत https://mahatet.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण व्हा; अन्यथा सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

