Friday, September 4, 2026
Homeनागपूरजन्मदात्या आई-वडिलांना ठार करणाऱ्या मुलाच्या डोक्यात संचारला होता सैतान.. - पालकांनी मैत्रिणीच्या...

जन्मदात्या आई-वडिलांना ठार करणाऱ्या मुलाच्या डोक्यात संचारला होता सैतान.. – पालकांनी मैत्रिणीच्या समोरच कानशिलात लगावल्याने मनात होता राग; पोलिसांपुढे केले कथन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-जन्मदात्या आई-वडिलांना ठार मारणारा अभियांत्रिकीचा विद्यार्थी उत्कर्ष डाखोळे याने सुनियोजित पद्धतीनेच हा कट रचल्याची बाब पोलिस चौकशीतून समोर आली आहे.वडिलांवर त्याने चाकूने वार केल्यानंतर त्यांनी त्याला असे न करण्याची वारंवार विनंती केली होती.मात्र,त्याच्या डोक्यात सैतानच संचारला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्षने काही महिन्यांअगोदर त्याच्या एका मैत्रिणीला आई-वडिलांची भेट करायला नेले होते.त्यावर संतापलेल्या वडिलांनी त्याच्यावर हात उगारला होता.त्याचा रागदेखील त्याच्या मनात होता.२१ वर्षीय उत्कर्षने २६ डिसेंबर रोजी वडील लीलाधर डाखोळे वय ५० वर्षे आणि आई अरुणा डाखोळे वय ४२ वर्षे यांची हत्या केली होती.घटनेच्या वेळी त्याची बहीण कॉलेजला गेली होती.ती आल्यावर गुपित उघड होईल या भीतीने त्याने तिला कोराडी येथील बैलवाडा येथील घरी नेले.काका व बहिणीला आई-वडील ध्यानासाठी बंगलोरला गेले असल्याचे सांगितले. १ जानेवारीला सकाळी ही घटना उघडकीस आली.उत्कर्ष भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये सतत नापास होत होता. बैलवाडा येथे शेतीचे काम करून तेथील आयटीआय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी त्याचे पालक त्याच्यावर दबाव आणत होते.२६ डिसेंबरला सकाळी अंत्यसंस्काराला जाण्यापूर्वी वडिलांनी ‘मी परत येईपर्यंत बैलवाड्याला जा,मला तुझे तोंड बघायचे नाही’, असा इशारा दिला होता.यानंतर आईने त्याचे कपडे बॅगमध्ये भरण्यास सुरुवात केली होती. बैलवाड्याला जाण्यापासून सुटका नाही म्हणून उत्कर्ष अस्वस्थ झाला.यानंतर त्याने दोघांनाही मारण्याचा निर्णय घेतला.सर्वप्रथम त्याने आई अरुणा यांचा गळा आवळून खून केला.त्यानंतर तो टीव्ही बघू लागला आणि वडिलांची परत येण्याची वाट पाहू लागला. त्याने वडील आल्यावर त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला व नंतर चाकूने वार केले. ‘तू मला मारू नको’ अशी विनंती ते वारंवार करत राहिले.मात्र,उत्कर्षने चाकूने वार करीत त्यांची हत्या केली.चौकशीदरम्यान तो मधेच पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांसोबत २४ तास उलटूनही उत्कर्षच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चात्ताप दिसून आलेला नाही. कपिल नगर पोलिसांनी उत्कर्षला न्यायालयात हजर केले असता त्याला ७ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

उत्कर्षचे एका तरुणीवर प्रेम होते व त्याला तिच्याशी लग्न करायचे होते.त्याने तिची आई-वडिलांशी भेट करवून दिली होती.मात्र,पालकांनी त्याला तिच्यासमोरच रागावले होते व वडिलांनी त्याच्या कानशिलात लगावली होती.यावरून उत्कर्ष संतापला होता.उत्कर्ष अनेकदा पार्टी करायचा व विविध कारणे सांगून तो पालकांकडून पैसे उकळायचा,त्याने पालकांची हत्या केल्यावर त्यांच्या मोबाइलमध्ये एसएमएस टाइप करून ठेवला होता.आम्ही आमच्या मर्जीने जीव देत असून शवविच्छेदन न करता आमच्या मृतदेहाचे थेट अंत्यसंस्कार करावे; असे त्यात नमूद होते.या हत्येला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा त्याचा प्रयत्न होता व त्याने याचे नियोजन केले होते; अशी माहिती सूत्रांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!