Wednesday, August 26, 2026
Homeनवी दिल्लीजगातील पहिली लस झाली तयार...- नाकाद्वारे देण्यात येणार लस;बुस्टर डोस म्हणून वापर- खासगी...

जगातील पहिली लस झाली तयार…- नाकाद्वारे देण्यात येणार लस;बुस्टर डोस म्हणून वापर- खासगी रुग्णालयात मिळणार लस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- नाकाद्वारे देण्यात येणारी जगातील पहिली नेझल लस ‘इनकोव्हॅक’ आजपासून उपलब्ध झाली आहे.भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही नेझल व्हॅक्सिन ‘इनकोव्हॅक’ लाँच केली आहे. हैदराबादमधील भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही लस विकसित केले आहे.नाकातून देण्यात येणारी ही लस बुस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे.

भारत सरकारने २३ डिसेंबर रोजी या लसीला मान्यता दिली होती.सर्वप्रथम,नाकाची लस खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.खासगी रुग्णालयांमध्ये यासाठी ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. या लसीचे बुकिंग फक्त Cowin पोर्टलवरून केले जाणार आहे.

बुस्टर म्हणून मिळणार सध्या इंजेक्शनद्वारे लसीकरण केले जात आहे.या लसीला इंट्रामस्क्युलर लस म्हणतात.नाकाची लस ही नाकातून दिली जाते.तिला इंट्रानासल लस म्हणतात.म्हणजेच, ते इंजेक्शनने देण्याची गरज नाही किंवा तोंडावाटे लसीप्रमाणे दिली जात नाही.हे स्प्रेसारखे आहे.कोवॅक्सिन आणि कोविशील्ड सारख्या लस घेणाऱ्यांना इंट्रानासल लस बूस्टर डोस म्हणून दिली जाईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!