Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीजंगल परिसरात फिरणारे चार संशयित निघाले जहाल नक्षलवादी.. - आज पोलीस व...

जंगल परिसरात फिरणारे चार संशयित निघाले जहाल नक्षलवादी.. – आज पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाची संयुक्त कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त असल्याने नक्षलवादी संघटना गनिमी काव्यासाठी व दडून बसण्यासाठी जंगलाचा आसरा घेत असतात व हिंसक कारवाया,जाळपोळ,हत्या व विवक्षित कृत्ये करीत असतात.अशातच नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याकरीता शासनाने ठोस पावले उचलली आहेत.गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात नव्याने पोलीस ठाणे उभारण्यात येत आहेत.त्यातच  गडचिरोली पोलिस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाने(सिआरपीएफ)जंगल परिसरात फिरणाऱ्या चार संशयितांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता,चारही संशयित व्यक्ती जहाल नक्षलवादी निघाल्याने आज,शनिवार १९ एप्रिलला अटक करून विविध कलमान्वये चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
माहितीनुसार,गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुका उपविभागातंर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन ताडगाव येथील पोलीस पथक व केंद्रीय राखीव पोलीस दल तुकडी क्रमांक-९ च्या एफ कंपनीचे जवान संयुक्तपणे नक्षलवाद विरोधी अभियान राबवित होते.अशातच त्यांना भामरागडच्या पल्ली जंगल परिसरामध्ये चार संशयित व्यक्ती फिरत असतांना आढळून आले.त्यामुळे चार संशयितांना पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता या ठिकाणी चौकशीसाठी नेले.अधिक चौकशी केली असता,चारही संशयित जहाल नक्षलवादी निघाल्याने पोलिसांना धक्काच बसला.त्यानुसार संशयितांनी आपली नावे-
१.सायलु भुमय्या मुडेला ऊर्फ रघु ऊर्फ प्रताप ऊर्फ इरपा (डीव्हीसीएस,दक्षिण गडचिरोली डिव्हीजन),वय ५५ वर्षे,रा.लिंगापूर,ता.दरपेल्ली,जि.निजामाचाद (तेलंगाना) (जैनी खराटम हिचा पती),
२.जैनी भिमा खराटम ऊर्फ अखीला ऊर्फ रामे (डिव्हीसीएम,भामरागड दलम/सचिव भामरागड एरीया कमिटी),वय ४१ वर्षे रा.कंचाला,ता. भोपालपट्टानम,जि.बीजापूर (छ.ग.)(सायलु मुडेला ऊर्फ रघु याची पत्नी),
३.झाशी दोघे तलांडी ऊर्फ गंगु (सदस्य,भामरागड दलम),वय ३० वर्षे, रा.येचली,ता.भामरागड जि. गडचिरोली.
४.मनिला पिडो गावडे ऊर्फ सरिता (सदस्य,भामरागड दलम), वय २१ वर्षे,रा.कापेवंचा ता.अहेरी,जि. गडचिरोली.
अशी नावे सर्वांनी सांगितली.त्यानुसार अधिक चौकशीअंती चारहीजण रेकॉर्डनुसार जहाल नक्षलवादी निघाले.ते पोलिसांची रेकी करून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने पल्ली जंगल परिसरात फिरत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.अशातच चारही नक्षलवादी हे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी  दिरंगी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलीस जवानाच्या हत्येमध्येही त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पोलीस स्टेशन कोठी येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!