Tuesday, August 25, 2026
Homeचंद्रपूरजंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू..

जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात एक भयंकर घटना आज,शुक्रवार २२ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला चढवून तब्बल चार महिलांना ठार केले आहे.सदरची घटना सिंदेवाही तालुक्याच्या गुंजेवाही जंगल परिसरात घडली.वाघाच्या हल्ल्यात संगीता संतोष चौधरी वय ३६ वर्षे,सुनीता कौशिक मोहुर्ले वय ३३ वर्षे,कवडूबाई दादाची मोहुर्ले वय ४५ वर्षे व अनुबाई दादाजी मोहुर्ले वय ४६ वर्षे अशी मृतक महिलांची नावे आहेत.विशेष म्हणजे,मागील वर्षाच्या १० मे २०२५ रोजी सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा(माल)येथील जंगल परिसरात वाघाने तब्बल तीन महिलांचा बळी गेला होता.त्यानंतरची ही दुसरी मोठी घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास
गुंजेवाही येथील १३ महिला तेंदूपाने तोडण्यासाठी
जंगलात गेल्या होत्या.तेंदूपाने तोडत असतांनाच सकाळी ९ वाजेच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर अचानकपणे हल्ला चढवला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला घाबरल्या व जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटल्या.अश्यातच चार महिलांवर वाघाने झडप घातली.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.इतर महिलांपैकी एक महिला ओरडतच गावात गेली आणि तिने आरडाओरडा करत गावकऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.त्यानंतर ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी तिथे चार महिलांचे मृतदेह आढळून आले.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला.वाघाच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी गस्त वाढवण्यात आली असून वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये,तसेच जाण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.घटनेने चौधरी व मोहुर्ले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गुंजेवाही गावात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!