- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-कलयुगात कोण कुणाच्या चुट्टी वरून हात फिरविणार हे सांगताच येत नाही.पैशाला आज इतके महत्व प्राप्त झाले आहे की कोण कुठल्या स्तराला जाईल,याची शास्वतीच राहिलेली नाही.एकच शेतजमीन परत दुसऱ्याला विकून जमीन खरेदी करणाऱ्यांमध्येच जुंपली असल्याची घटना सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम वळद येथे नुकतीच घडली.
वळद येथील विश्वनाथ भगत यांनी सुरुवातीला एक एकर शेती नुवरलाल चुन्नीलाल बोपचे यांना विकली होती.भगत यांनी त्या जमिनीची रजिस्ट्री न करता फक्त नोटरी करून दिली होती.एवढेच नव्हे तर तीच जमीन गावातील आरोपी सुभाष हिरालाल डोंगरे वय ४५ वर्षे यांनाही विकली.गुरुवारी नुवरलाल बोपचे हे शेतात गेले असता आरोपी सुभाष डोंगरे व संघर्ष सुभाष डोंगरे वय २५ वर्षे,रा.कवडी हे शेतावर होते व त्यांनी आमच्या शेतात का आला म्हणत नुवरलाल बोपचे यांना शिवीगाळ करून काठीने मारून गंभीर जखमी केले.घटनेसंदर्भात आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५१,(२),३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार डोंगरे करीत आहेत. भगत यांनी एकर शेती सर्वप्रथम नुवरलाल चुन्नीलाल बोपचे यांना विकून परत तिच शेती सुभाष डोंगरे यांना विकल्याचे सदर प्रकरणावरून उघडकीस आल्याने एकच शेतजमीन परत दुसऱ्यांना विकण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
- Advertisement -

