उद्रेक न्युज वृत्त
अर्जुनी मोरगाव(गोंदिया) :-गळ्यातील ओढणी आटा चक्कीच्या पट्टयाला अडकल्याने डोके धडापासून वेगळे होऊन महिलेचा मृत्यू झाला.ही घटना नवेगावबांध येथे काल,शुक्रवारी दि.२८ जून रोजी घडली.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली. नीतू हर्षल उजवणे वय ४६ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे.
आझाद चौकात हर्षल उजवणे यांची आटा चक्की आहे.काल,शुक्रवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नी नीतू नेहमीप्रमाणे आटा चक्कीवर दळण दळत असताना,त्यांच्या गळ्यातील ओढणी आटा चक्कीच्या पट्टयाला अडकली.त्यामुळे त्यांचे डोके आटाचक्कीच्या चाकाला अडकून ते धडापासून वेगळे झाले.त्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेने उजवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे आटा चक्कीसमोरील रस्त्यावर गावातील महिलांनी एकच गर्दी केली होती.hjही माहिती मिळताच येथील ठाणेदार पोलिस निरीक्षक योगिता चाफले आपल्या सहका ऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून शव उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, नवेगावबांध येथे पाठविले आहे.याप्रकरणी नवेगावबांध पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

