- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-वंचित बहुजन आघाडीची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज,शनिवार २९ मार्च रोजी गडचिरोलीच्या विश्राम गृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पक्ष संघटन बळकट करण्यासबंधाने चर्चा करण्यात आली.तसेच वंचित बहुजन आघाडीच्या खात्यावर ५० रुपये सहयोग राशी गोळा करून सक्रिय सदस्यत्व नोंद करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे,यासाठी विचारमंथन करण्यात आले.यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते प्रा.हितेश मडावी,वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे, जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम,मंगलदास चापले,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमराव शेन्डे,दुधे,युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सोनल देवतळे,चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रेम जगझाके, देसाईगंज तालुकाध्यक्ष विनोद मेश्राम,दिलिप बन्सोड,प्रकाश मेश्राम, निमगडे, गेडाम यांचेसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रसंगी गडचिरोली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे हजारो सदस्य नोंदणीचा निर्धार उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आला.
- Advertisement -

