Tuesday, September 1, 2026
Homeदेसाईगंजगडचिरोली आम आदमी पक्षाचा जुनी पेन्शन योजनेच्या मागणीला पाठिंबा- आपचे गडचिरोली जिल्हा...

गडचिरोली आम आदमी पक्षाचा जुनी पेन्शन योजनेच्या मागणीला पाठिंबा- आपचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- कित्तेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र सरकार अन्याय करीत असल्याने राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी; या मागणीला घेऊन काल १४ मार्च २०२३ पासून राज्यभरात आंदोलन पुकारित संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.आम आदमी पार्टीचा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला आणि आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे आम आदमी पक्षाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी यांनी कळविले आहे.

पंजाबमध्ये निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना पूर्ववत करण्याच्या आश्वासन दिले होते.सत्तेत येताच पंजाबमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.पंजाब सरकारच्या या निर्णयाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा कौतुक केले होते.२००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी राष्ट्रीय निवृत्तीवेतन पद्धती लागू करण्यात आली.या योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली काही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते.त्यामुळे निवृत्ती पश्चात मिळू शकणारा लाभ हा त्या-त्या समयीच्या बाजार स्थितीनुरूप बदलतो.त्यामुळे या नव्या पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांकडे दिवसेंदिवस विरोध तीव्र होत आहे.त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या मागणीला गडचिरोली आम आदमी पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे आपचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी यांनी म्हटले आहे.जुनी पेन्शन योजनेच्या पाठिंबा निमित्ताने आम आदमी पक्षाचे संपूर्ण कार्यकर्ते देसाईगंज येथे एकत्र गोळा होऊन घोषणेच्या माध्यमातून पाठिंब्याचे समर्थन करतांना दिसून आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!