Tuesday, June 23, 2026
Homeमूलक्षुल्लक कारणावरून पिता-पुत्रांनी कुऱ्हाडीने वार करून शेजाऱ्याचा केला खून…-आजची घटना…

क्षुल्लक कारणावरून पिता-पुत्रांनी कुऱ्हाडीने वार करून शेजाऱ्याचा केला खून…-आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मूल(चंद्रपूर) :-मूल तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदी गावामध्ये आज,शनिवार दिनांक- ६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास भयावह घटना घडली.घराशेजारी असलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर राजू बोदलकर यांनी पिपरे यांना केबल बाजूला करा असे सांगितले,मात्र केबल बाजूला कर असे का म्हटले म्हणून पिता-पुत्रांनी राजू यांच्यावर हल्ला केला.गुरुदास पिपरे व त्यांचा २१ वर्षीय मुलगा सूरज गुरुदास पिपरे यांनी शेजारी राहणाऱ्या ३४ वर्षीय राजू शेषराव बोदलकर यांचा कुऱ्हाडीने वार करत खून केला.या हल्ल्यात बोदलकर यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान,घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांचा राग अनावर झाल्याने ते आरोपींना पकडण्यासाठी जमले.यावेळी आरोपी गावकऱ्यांच्या हाती लागले असते तर त्यांना जिवंत जाळण्याचा प्रकार गावात घडला असता.मात्र मूल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी बाप-लेकाला ताब्यात घेतले आणि त्यामुळे अनर्थ टळला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!