Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिवडणुकांमध्ये धनशक्तीची भूमिका मोठी…!-एखादा बेरोजगार,गरीब आणि मध्यम वर्गातील व्यक्ती कधी आमदार,खासदार होतांना...

निवडणुकांमध्ये धनशक्तीची भूमिका मोठी…!-एखादा बेरोजगार,गरीब आणि मध्यम वर्गातील व्यक्ती कधी आमदार,खासदार होतांना बघितले काय?-कितीही प्रामाणिक,चारित्र्यवान किंवा जनसेवक असला तरीही निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहूच शकत नाही….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-निवडणुकांमध्ये धनशक्तीची भूमिका किती मोठी व महत्वाची असते; हे अनेकांना माहितच आहे.गरीब आणि मध्यम वर्गातील व्यक्ती इच्छा असतांनाही आमदार किंवा खासदार बनूच शकत नाही.सामान्य मनुष्य कितीही प्रामाणिक, चारित्र्यवान किंवा जनसेवक असला तरी तो निवडणूक लढण्याचे स्वप्न पाहू शकतो.मात्र, निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहूच शकत नाही. निवडणुकीत करोडो रुपये खर्च होत असतात. मतदारसंघ खूप मोठा असल्यामुळे प्रचाराच्या साधनांवर आणि मतदारांशी संपर्क साधण्यासाठी लाखो-करोडो रुपये खर्च करावे लागतात.जे लोक निवडणुकीवर लाखो-करोडो खर्च करू शकतात तेच निवडणूक लढू शकतात.व्यावसायिक राजकारण्यांचा निवडणुका हा जुगार बनलेला आहे आणि म्हणून तर निवडणुकांना श्रीमंतांचा खेळ म्हटले तर त्यात काहीही वावगे ठरूच शकणार नाही.पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगरपालिकांच्या निवडणुकीत उमेदवार लाखो रुपये खर्च करतात,तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीतील खर्चाची कल्पनाही करू शकत नाही.निवडणुका अतिशय खर्चिक झालेल्या आहेत.जे अपक्ष उमेदवार असतात,त्यांना तर निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता नसतेच. ज्यांना पक्षाकडून उमदेवारी मिळते,त्याच उमेदवारांना जिंकण्याची आशा असते.याचे कारण असे की,त्यांचा निवडणुकीचा खर्च संबंधित पक्षच करीत असतो. प्रचारासाठी त्यांना पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वप्रकारची साधनसामग्री मिळत असते.राजकारण ज्यांचा व्यवसाय असतो,तेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात.

ज्यांना गरिबी,महागाई आणि बेकारीचा प्रत्यक्ष अनुभव नसतो ते खासदार संसदेमध्ये या विषयावर चर्चा करतात आणि शहरी वा ग्रामीण गरिबी रेषा ठरवितात.काही वर्षांपूर्वी असे ठरविण्यात आले होते की,२६ रुपये रोज मिळविणारा ग्रामीण आणि ३२ रु. रोज मिळविणारा शहरी व्यक्ती गरिबी रेषेच्या बाहेर असतो.खरे म्हणजे इतक्या कमी पैशांमध्ये जीवन जगणे तर दूर,परंतु एका व्यक्तीचे भोजनही होऊ शकत नाही.बहुतांश खासदार शहरात राहतात. शहरातील मॉलमधील गर्दी आणि सडकेवर जो जॅम लागतो हे बघून ते गरीब आहेत,असे मानण्यास तयारच नसतात.या खासदारांचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो.त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर,त्यांचा स्वयंपाकी आणि त्यांच्या नोकरचाकरावरूनच ते गरिबीबाबत धारणा करून घेतात.निवडणुकीच्या प्रचारात ते गरिबीविषयी बोलतात आणि निवडणूक जिंकल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनतेचे दुःख विसरून जातात.अशी अवस्था निर्माण झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!