Friday, September 25, 2026
Homeनागपूरकोरोनामध्ये किंवा युद्धामध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल,तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातामध्ये...

कोरोनामध्ये किंवा युद्धामध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल,तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातामध्ये होतात.. – लोकांची मानसिकता बदलत नाही; तोपर्यंत आपण यावर नियंत्रण मिळवू शकत नाही- नितीन गडकरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२५’ दिनांक- १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.त्यानुसार विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करून रस्ते सुरक्षा बाबत जनजागृती करण्यात येत आहे.अश्याच एका कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की,वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना कितीही दंड ठोठावला,कितीही कडक कायदे केले; तरीही रस्ते अपघातातील मृत्यू थांबलेले नाहीत.हेल्मेट न घातल्याने मृत्यूचे प्रमाण मोठे आहे.लोकांची मानसिकता बदलत नाही; तोपर्यंत आपण यावर नियंत्रण मिळवू शकत नाही.शासकीय वाहनांमध्ये देखील नियम पाळले जात नाहीत.अनेकदा मी दंड वाढवला म्हणून नाराजी पत्करली.मात्र,शालेय जीवनातच वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणे आवश्यक आहेत; असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज,शनिवार ११ जानेवारीला सडक सुरक्षा अभियानांतर्गत वनामती येथे आयोजित कार्यक्रमात अभिनेते अनुपम खेर यांनी गडकरी यांची प्रकट मुलाखत घेतली.प्रसंगी ते बोलत होते.
गडकरी म्हणाले की, ‘कोरोनामध्ये, युद्धामध्ये किंवा एखाद्या दंगलीमध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसेल,तेवढे मृत्यू दरवर्षी रस्ते अपघातामध्ये होतात. याची मला खंत वाटते.या देशात आणखी उत्तम रस्ते तयार होतील.पण लोकांना शिस्त नसेल,तर या रस्त्यांचा काहीही उपयोग नाही.सिग्नल तोडणे,लेन तोडून निघून जाणे,मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालणे,हेल्मेट न लावणे,सिटबेल्ट न बांधणे,अशा कितीतरी चुका लोकं करतात.आपली आई,पत्नी,मुले घरी वाट बघत असतील,हे ध्यानात ठेवून गाडी चालवावी.कारण वर्षभरात होणाऱ्या अपघतांमध्ये जे मृत्यू होतात,त्यात १८ ते ३४ वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या जास्त आहे.एखाद्या घरातील तरुण अचानक निघून जातो,तेव्हा त्या कुटुंबावर कोसळणाऱ्या संकटाची आपण कल्पनाही करू शकत नाही; अशा भावनाही गडकरी यांनी व्यक्त केल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!