Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरकोरोना काळातील केस डीसमिस; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह सर्व निर्दोष..

कोरोना काळातील केस डीसमिस; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह सर्व निर्दोष..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-संपूर्ण देशात कोरोना लॉकडाऊन लागू असतांना बावनकुळे व इतरांनी ओबीसी आरक्षणाकरिता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ३१ मे २०२१ रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत संविधान चौकामध्ये आंदोलन केले होते.ओबीसी समाजाला २७ टक्के राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे,अशी मागणी करत सरकारविरुद्ध घोषणा दिल्या होत्या.त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी बावनकुळे व इतरांविरुद्ध कायदेशीर आदेशाचे उल्लंघन,संसर्गजन्य आजार पसरवणारी कृती इत्यादी गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविला होता; तसेच १७ जुलै २०२३ रोजी न्यायालयात खटला दाखल केला होता; परंतु एकाही आरोपीवरील गुन्हे सिद्ध होऊ शकले नाही.प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमदार कृष्णा खोपडे,आमदार समीर मेघे,आमदार प्रवीण दटके,माजी आमदार विकास कुंभारे,माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह इतर सर्व आरोपींना ठोस पुराव्यांअभावी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन.एन.चिंतामणी यांनी निर्दोष मुक्त केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!