- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(देसाईगंज):-युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज,रविवार दिनांक-१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कोंढाळा गावातील मुख्य चौकाच्या ग्रामपंचायत व्यासपीठावर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम यांच्या नेतृत्वात आयोजित ‘चलो पंचायत-चलो वार्ड कार्यक्रम’ राज्याचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सर्वसामान्य जनता तसेच गोर-गरीबांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम हे केवळ काँग्रेसच करू शकते. राज्यातील सरकार हे ‘तीन तिघडा काम बिघडा’ करून आपलीच पोळी शेकण्याचे काम करीत असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत तिघडी व तुघलक सरकारला जनताच धडा शिकवेल; असे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रसंगी राज्याचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत बोलत होते.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा निरीक्षक पुष्पेंद्र शाहू,गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे,काँग्रेसचे कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल,डॉ.मेघा सावसागडे युवक काँग्रेस सरचिटणीस,देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले,माजी पंचायत समिती उपसभापती नितीन राऊत,कुरखेडा पंचायत समितीचे माजी उपसभापती गिरिधर तितराम,अनुज घोसे,सुरज भोयर,कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,युवा कार्यकर्ते अमर भर्रे तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम म्हणाले की,सर्वप्रथम आम्ही जनतेच्या समस्या मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.तळागळातील लोकांची कामे प्राधान्याने करून ८० टक्के समाजकारण करीत आहोत.’चलो पंचायत-चलो वार्ड’ च्या माध्यमातून जनतेशी पूर्वीपासूनच नाळ जुळलेली असल्याने अविरतपणे कार्य करीत राहणार असल्याचे प्रतिपादन मसराम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन आक्रोश शेंडे यांनी केले तर प्रास्ताविक नितीन राऊत यांनी केले.आभार अमर भर्रे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सागर वाढई,स्वप्नील मिसार,गौरव शिलार,मोहित राऊत, निशांत वनमाळी,तेजस नवघडे,आशुतोष भरणे,जितू चौधरी,लंकेश ढोरे,उमाकांत दोनाडकर,गोपाल दोनाडकर,चारुदत्त राऊत,रोशन कवासे, आकाश पेटकुले आदींनी सहकार्य केले.
- Advertisement -

