Wednesday, September 9, 2026
Homeदेसाईगंजकृषीच्या नावावर उचल केलेले शेकडो ट्रॅक्टर व्यवसायीक कामाकरीता…-कंत्राटदार,बिल्डर आणि रेतीमाफियांचा सर्वाधिक समावेश…

कृषीच्या नावावर उचल केलेले शेकडो ट्रॅक्टर व्यवसायीक कामाकरीता…-कंत्राटदार,बिल्डर आणि रेतीमाफियांचा सर्वाधिक समावेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत.यामध्ये फळबाग लागवड,गाय-म्हैस अनुदान योजना,मजगी,भातखाचार पुनर्जीवन,शेततळे, स्वंचालित यंत्रे वाटप योजना,रोपवाटिका व अन्य इतर योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो आहे. अशातच अनुदानावर आधारित ट्रॅक्टर खरेदी अनेक शेतकऱ्यांकडून केले जात आहेत.मात्र,प्रत्येक शेतकरी नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकत नसल्याने एखाद्या व्यक्तीला ट्रॅक्टर खरेदी करून देत आपले नाव पुढे करण्याचा फंडा हल्ली अमलांत आणला जात असल्याचे वास्तव चित्र नजरेसमोर दिसून येत आहे.त्यामुळे अनेकजण योजनांचा गैव्यवहार करतांना लक्षात येते.नवीन ट्रॅक्टर,खरेदी करून त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार,अशी नोंदणी केली जाते. त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करामध्ये सूट मिळते.मात्र,बरेच व्यवसायिक कृषीच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यवसायिक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली.सद्यस्थितीत जिल्ह्यात कृषीच्या नावावर उचल केलेले शेकडो ट्रॅक्टर व्यावसायिक कामासाठी वापरले जात असल्याची बाब पुढे आली आहे.तसेच काहीजण अवैध रेतीचा उपसा करण्याकरीताही ट्रॅक्टर चा वापर करीत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.शासन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवित आहे. यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवलत दिली जात आहे.याचा लाभ शेतकऱ्यांनाही होत आहे.मात्र,इतर कृषी योजनांप्रमाणे याही योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या नावावर इतर लोक घेत 

आहेत.नियमानुसार ‘कृषी कामासाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा वापर हा कृषिसाठी करणे गरजेचे आहे.या ट्रॅक्टरचा व्यवसायिक कामासाठी उपयोग केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्याची तरतूद आहे.शिवाय या ट्रॅक्टरची नोंदणीही रद्द करण्याची तरतूद आहे.मात्र, बऱ्याच जणांकडून शेतीचा सातबारा जोडून ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी उपयोग होत आहे; यात कंत्राटदार,बिल्डर आणि रेतीमाफियांचा सर्वाधिक समावेश आहे.कारवाई होत नसल्याने रस्त्यावर धावत असलेल्या ट्रॅक्टरची उचल ही नेमकी कशासाठी केली आहे; ही बाब ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पाहणीशिवाय कळत नाही.त्यामुळे अशांवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!