Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील तेविसाव्या सत्राचा निकाल जाहीर..-तेविसाव्या सत्रात कुरखेडा येथील संगीता ठलाल...

नाट्यश्री कविता स्पर्धेतील तेविसाव्या सत्राचा निकाल जाहीर..-तेविसाव्या सत्रात कुरखेडा येथील संगीता ठलाल विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” उपक्रमाचे तेविसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २४  कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवयित्री सौ. संगीता संतोष ठलाल यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “भृणहत्या” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

संगीता संतोष ठलाल या मौजा- कुरखेडा (जिल्हा- गडचिरोली) येथील रहिवासी असून प्रसिद्ध कवयित्री, समिक्षक,स्फूट लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या आहेत.तीन हजार च्या जवळपास कविता व इतर साहित्याचे लेखन त्यांनी केलेले आहे.अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता,लेख,समिक्षणे प्रकाशित झालेली आहेत.व्हॉट्सॲप गृपवरुन सुरू असलेले त्यांचे स्वरचित विचारधारा हे सदर विशेष लोकप्रिय असून जवळपास १०००चा टप्पा या सदराने पार केलेला आहे.त्यांना अनेक ऑनलाईन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या तेविसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रेमिला अलोने,वंदना सोरते,अजय राऊत,माधुरी अमृतकार, मधुकर दुफारे,सुनील मंगर,नरेंद्र गुंडेली,तुळशीराम उंदीरवाडे, पुनाजी कोटरंगे,सुरज गोरंतवार,गणेश रामदास निकम,प्रभाकर दुर्गे,विलास जेगठे,संगीता ठलाल,सुजाता अवचट,पी.डी.काटकर,मुरलीधर खोटेले,संतोष कपाले,पुरुषोत्तम दहिकर,खुशाल म्हशाखेत्री,रेखा दिक्षित,डॉ.मंदा पडवेकर,ज्योत्स्ना बंसोड व जयराम धोंगडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे चुडाराम बल्हारपुरे  (नाटककार) यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!