Wednesday, June 24, 2026
Homeकुरखेडाकृषी पंपाच्या १६ तास विद्युत पुरवठा मागणी करीता १५ मार्च ला कुरखेडा...

कृषी पंपाच्या १६ तास विद्युत पुरवठा मागणी करीता १५ मार्च ला कुरखेडा आम आदमी पक्षाचा चक्का जाम आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा :- शेती पंपा करिता दिला जाणारा ८ तासाचा विद्युत पुरवठा वाढवून १६ तास करावे अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करेल असा निवेदन काही दिवसांपूर्वी सादर करून शासनास इशारा दिला होता. 

शासन स्तरावरून कुठलेही पाऊल शेतकऱ्यांच्या हितासाठी उचलण्यात न आल्याने येत्या १५ मार्च २०२३ ला गेवर्धा येथे गुरनोली फाट्या जवळ सकाळी ११ वाजता पासून रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करणार असल्याचे पत्र कुरखेडा आम आदमी पक्षाच्या वतीने कुरखेडा तहसीलदार व पोलीस ठाण्यातील प्रमुख यांना सादर केलेला आहे.

कूरखेडा तालुक्यात दिला जाणार कृषी पंप विद्युत पुरवठा केवळ ८ तास दिला जात आहे.यामुळे उन्हाळी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची शेत पिके करपण्याच्या स्थितीत असल्याने सदर ८ तासाचा विद्युत पुरवठा १६ तास न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला समोर जावे लागेल.यापूर्वी १२ तास विद्युत पुरवठा असल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचे धाडस केले.परंतु मागील एक महिन्यापासून कृषी जोडणी असलेल्या विद्युत पंपांना केवळ ८ तास वीज मिळत असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपण्याच्या स्थितीत असून कृषी पंपाचा वीज पुरवठा १६ तास न केल्यास शेतकरी बांधवांचे पीक करपून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.उद्योग नसलेल्या जिल्हा व मागासलेली स्थिती असलेल्या या भागात शेती हे एकमेव रोजगाराचे साधन आहे. त्यातच वीजपुरवठा केवळ ८ तास झाल्यास शेती कशी पिकवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा येऊन ठाकला आहे.

सदर अन्यायपूर्ण बाबीचा पुनर्विचार करावा व शेतकरी बांधवांच्या कृषी पंपा करिता १६ तास वीज पुरवठा करण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा; या मागणी करिता व शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात आम आदमी पार्टीने शेतकरी हितार्थ रस्त्यावर उतरून येत्या १५ मार्चला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!