Monday, May 25, 2026
Homeकुरुडकुरुड येथील शिवजयंती आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष उपस्थितीत पडणार पार....

कुरुड येथील शिवजयंती आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष उपस्थितीत पडणार पार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरुड :- नवतरुण युवक मंडळ बळीराजा चौक,सुभाष वार्ड कुरुड यांच्या वतीने शिवजयंती महोत्सव येत्या १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.सदर शिवजन्मोत्सव १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार असून १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.००वाजता स्वच्छता अभियान दुपारी १२.३० महाशिवरात्रि घटस्थापना महादेव मंदिर सुभाष वार्ड व नवीन पाण्याची टाकी रात्री ६.३०वाजता उद्घाटन सोहळा व बक्षीस वितरण लगेच शिवचरित्रावर शिवव्याख्याते हरिभक्त परायण कुमारी कांचनताई शिवानंद शेळके अमडापूर पो.कुरडी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांचे सायंकाळी ८.३० वाजता व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून विशेष उपस्थिती विजय भाऊ वडेट्टीवार माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्र, कुमारी शिवानीताई विजय भाऊ वडेट्टीवार महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस,सहउद्घाटक महेंद्र ब्राह्मणवाडे अध्यक्ष,नामदेव उसेंडी प्रदेशाध्यक्ष आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य तथा माजी आमदार आणि निमंत्रित मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडणार आहे. शिवव्याख्यानाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा; असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिवजन्मोत्सवा दरम्यान १७ फेब्रुवारीला दुपारी २.५० ते ३.४०वाजता स्थळ जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कुरुड तथा राधेश्याम बाबा विद्यालय कुरुड येथे सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.१९ फेब्रुवारी सायंकाळी ४.०० वाजता शिवाजी महाराजांची भव्य दिव्य पालखी सोहळा व लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.२० फेब्रुवारी दुपारी १.०० वाजता महादेव मंदिर येथे जाहीर कीर्तन व गोपाल काला, सायंकाळी ४.००वाजता महाप्रसाद,सायंकाळी ६.०० वाजता सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त शिवप्रेमींनी आपली उपस्थिती दर्शवावी; असे आयोजक मंडळांनी आवाहन केलेले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!