- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा-को रची मार्गावरील सती नदी पुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे.मार्गावरील वाहतूक सुरू रहावी यासाठी दरवर्षी पुलाच्या बाजूने रपटा तयार करण्यात येतो. मात्र,पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तयार करण्यात आलेला रपटा वाहून जात असल्याने दरवर्षीच मार्गावरील वाहतूक विस्कळित होत आहे. त्यामुळे कुरखेडा-कोरची व परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो आहे.अश्यातच पर्यायी मार्गाचीही दैनावस्था होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागतो.हीच बाब लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी कुरखेडा सती नदी मार्गावरील नव्या पुलाचे बांधकाम,वाहून गेलेला रपटा व पर्यायी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून पुलाच्या काही ठिकाणी भेगा पडलेल्या दिसून आल्याने त्यांनी संबंधित प्लांटला भेट देऊन कामाचा दर्जा तपासला.तसेच पर्यायी मार्ग असलेल्या आंधळी मार्गाची दैनावस्था लक्षात घेता संबंधित विभागाला दोन दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.कामाची गुणवत्ता अत्यंत आवश्यक असल्याने संबंधित कंत्राटदासह विभागाला योग्य दर्जाचे काम करावे,अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल,अशा सूचना आमदार मसरामांनी केल्या.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट,माजी सभापती परसराम टिकले,तहसीरदार कुंभरे,नायब तहसीलदार धनबाते, माजी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष जयंत हरडे,माजी कुरखेडा पंचायत समिती सभापती गिरीधर तीतराम, युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रांजल धाबेकर,माजी नगरसेवक उस्मान पठाण,भावेश मुंगणकर,हरिदास नाकतोडे सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -

