Friday, October 16, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा तालुक्यात प्रहार संघटनेला 'दे धक्का'..! - आंधळीचे उपसरपंच अप्रव भैसारे...

कुरखेडा तालुक्यात प्रहार संघटनेला ‘दे धक्का’..! – आंधळीचे उपसरपंच अप्रव भैसारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेस पक्षात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सर्वप्रथम
सुरुवात ही गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातूनच करण्यात आली होती.त्याकाळी प्रहार संघटनेची आंदोलने व सामाजिक कार्ये हे अनेकांच्या मुखी पडू लागले होते व हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात प्रहार संघटना उदयास आली.अश्यातच आता कुरखेडा तालुक्यात प्रहार संघटनेला ‘दे धक्का’ करीत शेकडो पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला.यात प्रहारचे जिल्हा पदाधिकारी व आंधळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अप्रव पुरंदर भैसारे,सोनपूरचे उपसरपंच प्रवीण चौधरी,सामाजिक कार्यकर्ते गौरव रामटेके,संदीप कराडे,हेमंत भानारकर,कमलेश विहीरघरे, सचिन जांभुळकर,अंकुश कराडे, तुलाराम टेम्भूर्णे, आनंदराव कऱ्हाडे,रवींद्र कऱ्हाडे, खेमराज लाकडे,गणेश भैसारे,राजकुमार जनबंधू, बबलू लाकडे,कैलास कऱ्हाडे, सुरेश सहारे,देविदास भानारकर,गौतम कऱ्हाडे,प्रल्हाद राऊत,खुशाल जनबंधू,विठ्ठल बोदेले,आयुश बोदेले, धनंजय नागोसे, आश्रय जांभूळकर यांच्यासह कमल जांभुळकर, संघमित्रा(तंटामुक्त अध्यक्षा),मंगला राऊत, शालूताई जांभुळकर (दिव्यांग महिला प्रमुख),मिनाक्षी लाकडे, अंतकला कऱ्हाडे,अल्का जनबंधू,श्रुती जांभुळकर सामाजिक कार्यकर्त्या व महिला प्रतिनिधींनीही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
पक्ष प्रवेश करतेवेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,जिल्हा निरीक्षक तथा आरमोरी विधानसभा निरीक्षक सचिन नाईक, कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट,माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत हरडे,मूज्जेपरबारी शेख,दिनेश सिडाम,भास्कर पुसाम, युवा तालुकाध्यक्ष प्रांजल धाबेकर,महिला प्रतिनिधी पल्लवी पुसाम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपसरपंच अप्रव भैसारे म्हणाले की, “दिव्यांग, विधवा,वयोवृद्ध व वंचित घटकांच्या समस्या विधानसभेत व लोकसभेत काँग्रेसचे जेष्ठ नेते मांडतील अशी आशा आहे.माझा सामाजिक कार्याचा अनुभव नक्कीच काँग्रेसच्या बळकटीसाठी उपयोगी पडेल,”
कुरखेडा तालुक्यातील पक्षप्रवेश सोहळा काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर भर घालणारा तसेच  तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना बळकटी देणारा ठरला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!