Wednesday, September 2, 2026
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील नांदी येथील रहिवासी असलेल्या वीज ग्राहकाला लोक न्यायलयाने दिलासा देत वादग्रस्त वीज बिल पाठविणाऱ्या महावितरण कंपनीला पीडित ग्राहकास ३ हजार रुपयांची भरपाई मंजूर करत वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले.माणिक हुळके,असे दिलासा मिळालेल्या ग्राहकाचे नाव आहे.
विद्युत वितरण कंपनीने माणिक हुळके यांना ऑगस्ट व नोव्हेंबर-२००६ मध्ये अवाक्याबाहेर वीज बिल पाठविले होते.हुळके यांनी त्यावर आक्षेप घेऊन वीज मीटर तपासण्याची मागणी केली होती.त्याकरिता शुल्कही जमा केले होते.परंतु,महावितरण कंपनीने मीटर तपासणी केली नाही.उलट फेब्रुवारी-२००७ मध्ये हुळके यांचा वीजपुरवठा खंडित केला.त्यानंतर महावितरणने १ नोव्हेंबर २०२४ रोजी हुळके यांना १ लाख ७ हजार ५९० रुपये वीज बिल वसुलीची नोटीस बजावली.त्याविरुद्ध हुळके यांनी स्थायी लोकन्यायालयात तक्रार दाखल केली होती. दरम्यान,न्यायालयाने सुरुवातीला हा वाद सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न केला.पण,त्यात यश मिळाले नाही.परिणामी,गुणवत्तेच्या आधारावर न्यायालयाचे अध्यक्ष दीपक भेंडे व सदस्य प्रतिभा अनकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.सुनावणी करून  माणिक हुळके यांना भरपाईसह वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!