Thursday, August 6, 2026
Homeगोंदियाकार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले; तीन ते चार वेळा उलटली आणि झाडाला...

कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले; तीन ते चार वेळा उलटली आणि झाडाला धडकली.. -एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन तीन ते चार वेळा उलटली आणि तब्बल ५० फूट अंतरावर फरफट जात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली.यात २३ वर्षीय तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागून घटनास्थळीच मृत्यू झाला,तर सहकारी मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना काल शनिवारी दुपारच्या सुमारास गोरेगाव-कोहमारा मार्गावरील मुरदोली गावाजवळ घडली.रुपेश नरेश भोगारे वय २३ वर्षे,रा.पिंडकेपार,ता.गोरेगाव,जि.गोंदिया असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे,तर २३ वर्षीय प्रफुल पटले रा.तुमखेडा ता.गोरेगाव असे जखमीचे तरुणाचे नाव असून दोघेही चांगले मित्र आहेत.
काल शनिवारी दुपारच्या सुमारास रुपेश व प्रफुल हे दोघेही एमएच ३५ एजी ३९५८ क्रमांकाच्या कारने गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथून कोहमाराच्या दिशेने निघाले होते.कार भरधाव वेगात असल्याने कोहमारा मार्गावरील मुरदोली गावाजवळ येताच चालकाचा  गाडीवरील ताबा सुटला.ताबा सुटताच कार तीन ते चार वेळा उलटली आणि मुख्य रस्त्यापासून तब्बल ५० फूट अंतरावर फरफट जात रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन जोरदार आपटली.यात कार पूर्णपणे क्षतिग्रस्त होऊन कारमधील रुपेशच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर प्रफुल गंभीर जखमी झाला.कार झाडावर धडकण्यापूर्वी तीन ते चार वेळा उलटल्याचे  मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनी प्रत्यक्ष बघितले होते.घटना घडताच मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेत मदतकार्य सुरू करून घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून जखमी प्रफुलला तात्काळ गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.लागलीच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून रुपेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.अवघ्या २३ वर्षाच्या तरुणावर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!