Sunday, September 13, 2026
Homeमुंबईकाय सांगता..? आता लाडक्या बहिणींना कर्ज काढून देण्यात येणार हप्ते..

काय सांगता..? आता लाडक्या बहिणींना कर्ज काढून देण्यात येणार हप्ते..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-शासनाच्या सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या विभागाचा निधी अन्य विभागाकडे वळविण्याला तीव्र विरोध दर्शविला होता.मात्र,त्यांच्या विरोधाला केराची टोपली दाखवित राज्य सरकारने हा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळविला आहे.सामाजिक न्याय विभागाचे मंत्री नाराज झाल्यानंतर राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर २०२५-२६ या आर्थिक वर्षात १ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज घेणार आहे.त्यातील साधारणतः तीन हजार कोटी रुपये दरमहा लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राज्यात सप्टेंबरपर्यंत महापालिकांसह हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.याशिवाय अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर बहिणी नाराज होऊ नयेत,याची खबरदारी घेतली जाणार आहे.त्यासाठी कर्ज काढून त्यांना हप्ते देण्यात येणार आहेत.दरमहा २५ तारखेपूर्वी लाभ बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे. कोरोनानंतर राज्याने ४ लाख १३ हजार १५६ कोटींचे कर्ज घेतल्याची नोंद अर्थसंकल्पात आहे.२०१५-१६ ते २०२५-२६ या दहा वर्षांत सरकारवर ६ लाख कोटींचे कर्ज वाढले आहे.त्यापोटी सरकारला दरमहा ६१ हजार कोटींपर्यंत व्याज द्यावे लागत असल्याचीही नोंद अर्थसंकल्पात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!