Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीचुडाराम बल्हारपुरे यांना राज्यस्तरीय समाज चिंतामणी पुरस्कार २०२५ जाहीर.. - जळगाव...

चुडाराम बल्हारपुरे यांना राज्यस्तरीय समाज चिंतामणी पुरस्कार २०२५ जाहीर.. – जळगाव येथे झाडीपट्टी नाटककार यांचा सन्मान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जळगाव येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठान या मान्यताप्राप्त सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या कर्मविरांना राज्यस्तरीय समाज चिंतामणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते व मान्यवरांचे हस्ते त्यांचा गौरव करण्यात येतो.महाराष्ट्रातील साहित्य व सांस्कृतीक क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरीता झाडीपट्टीतील नाट्य सेवेबद्दल तसेच साहित्य सेवेबद्दल यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांची निवड करण्यात आल्याचे समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी.कोळी यांनी निवड पत्राद्वारे कळविले असून येत्या रविवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत भवन सभागृहात होणाऱ्या सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार  ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसभेचे सदस्य आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांचे शुभहस्ते तसेच समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.आर. डी.कोळी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,सन्मान वस्त्र, सन्मानपत्र असे आहे.
कार्यक्रमास मिनल करमवार,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.जळगाव तसेच डॉ.महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक जळगाव,ज्ञानेश्वर ढेरे म.न.पा.आयुक्त जळगाव,संस्थेचे उपाध्यक्ष जयसिंग सोनवणे व सचिव शालिनी सैंदाणे हे उपस्थित राहणार आहेत.विशेष म्हणजे,नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके, महापूजा या महानाट्यांना विविध संस्थांतर्फे पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,प्रा.यादव गहाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा.डॉ.योगीराज नगराळे,डॉ. राजकुमार मुसणे,डॉ.दिपक चौधरी,नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,रमेश निखारे,प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक),प्रा.संतोष मेशराम,प्रा. संजय लेनगुरे,मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक)व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!