- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-पावसाळा सुरू व्हायला बराच कालावधी असून ऐन उन्हाळ्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने देसाईगंज शहराच्या आंबेडकर व माता वॉर्डातील प्राथमिक शाळेच्या समोर असलेल्या नाल्यांचे पाणी तुंबल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे परिसरात दूषित पाणी आणि दुर्गंधीचा साच होऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असूनही याकडे देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.त्यामुळे कर वसूल करताय, पण नागरिकांच्या आरोग्याचे काय?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.
नगर परिषद प्रशासन साफसफाईसाठी नागरिकांकडून कर वसूल करीत असते. कराच्या माध्यमातून आरोग्य,दिवाबत्ती,रस्ते,नाले सफाई व इतर कामे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येतात.परंतु करण्यात येणारी नाली सफाई कागदावरच होत असते.असा गंभीर आरोप काँग्रेस युवा नेते पिंकू बावणे यांनी नगर प्रशासनाला केला आहे.सध्या स्थितीत एक पाऊस पडला आणि नाल्यांमध्ये पाणी तुंबले,तर पावसाळ्यात या नाल्यांची स्थिती काय होईल?अशातच प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून नाल्यांची साफसफाई व स्वच्छता न केल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बावणे यांनी दिला आहे.
- Advertisement -

