Friday, September 4, 2026
Homeगोंदियाकंत्राटी कनिष्ठ अभियंत्यासह ग्रामपंचायत शिपाई व खासगी व्यक्ती अडकला एसीबीच्या जाळ्यात... -...

कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यासह ग्रामपंचायत शिपाई व खासगी व्यक्ती अडकला एसीबीच्या जाळ्यात… – घरकुल बांधकाम अनुदानातून मागितली १० हजाराची लाच…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-अगोदरच घरकुल बांधकामासाठी शासनाकडून तुटपुंजे अनुदान दिले जाते.अशातही लाभार्थ्यांकडून पैश्याची मागणी केली जात असेल तर यांच्या सारखे महामूर्ख मानव जगात कुणीही नाही; असेच म्हणावे लागेल.चक्क एका शेतमजूर व्यक्ती कडून घरकुलाचा हप्ता जमा झाल्याने घरकूल लाभार्थ्याकडून १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कंत्राटी कनिष्ठ अभियंता व त्याच्या दोन साथीदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी १ जानेवारीला लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे.कंत्राटी गृहनिर्माण अभियंता प्रमोद बीरसिंग उपवंशी वय ३८ वर्षे,पंचायत समिती गोंदिया, रा.शारदा कॉलनी,कुडवा,ग्रामपंचायत शिपाई धनंजय मुन्नालाल तांडेकर वय ४५ रा.कामठा, खासगी व्यक्ती विश्वनाथ गोविंदराव तरोणे वय ६२ वर्षे,रा.लहरी आश्रम रोड,कामठा असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार शेतमजुरी करीत असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले.दरम्यान, घरकुलाच्या अनुदानाचा पहिला हप्ता १५ हजार रुपये त्यांच्या खात्यात वळती झाल्याचे आरोपी धनंजय तांडेकर याने तक्रारदाराला कळविले.या आधारावर त्यांनी घरकुलाचे बांधकाम चालू केले व पायाभरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर धनंजय तांडेकर यास कळविले. यानंतर २७ नोव्हेंबर २०२४ रोजी कंत्राटी गृहनिर्माण अभियंता प्रमोद उपवंशी व ग्रामपंचायत शिपाई धनंजय तांडेकर यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन घराच्या बांधकामाचे फोटो काढले.तक्रारदाराच्या मुलाला घरकुलाच्या अनुदानाची उर्वरित रक्कम वर्ग करणार असून त्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची मागणी केली.२१ डिसेंबरला तक्रारदाराला फोन करून अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचे ७० हजार खात्यात वर्ग केल्याचे सांगून १० हजार रुपये तांडेकर याच्याकडे देण्यास सांगितले होते.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक सापळा रचून रंगेहाथ पकडले.सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन कदम,संजय पुरंदरे, पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उपअधीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उमाकांत उगले,सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे,पोलिस हवालदार संजय कुमार बोहरे,मंगेश काहालकर, नायक पोलिस शिपाई संतोष शेंडे,संतोष बोपचे, अशोक कापसे,प्रशांत सोनेवाणे,महिला नायक पोलिस शिपाई संगीता पटले,रोहिणी डांगे,चालक नायक पोलिस शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!