- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-स्मार्टफोनमुळे ऑनलाईन गेम खेळाचे जाळे खूप दूरवर पसरले.यात पैश्याची गुंतवणूक करून गेम खेळणाऱ्यास मोठी रक्कम देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवले जाते. त्यामुळे अनेकजण गेमाच्या आहारी जाऊन सर्वकाही गमावून बसतात.त्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणाऱ्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर केले आहे. आता यापुढे ऑनलाईन गेमिंग आणि त्याची जाहिरात करणे गुन्हा मानले जाणार आहे.या कायद्यानुसार,दोषींना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.याबाबत आज,शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेल्या विधेयकाला मंजुरी दिली आहे.यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले असून देशातील ऑनलाइन गेमिंग उद्योगाला अब्जो रुपयांचा फटका बसणार आहे.सर्वात मोठा हादरा ड्रीम ११,माय ११ सर्कल, winzo गेम यांना बसला आहे. त्यामुळे यामध्ये वा इतर गेममध्ये पैसे जमा असलेल्यांनी त्वरित रक्कम काढून घेणे आवश्यक आहे.
- Advertisement -

