Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजएसपी साहेब; लक्ष द्या हो..! देसाईगंज पोलीस ठाण्यात चालले तरी काय? सर्वसामान्य...

एसपी साहेब; लक्ष द्या हो..! देसाईगंज पोलीस ठाण्यात चालले तरी काय? सर्वसामान्य नागरिकांवर पटकन गुन्हे दाखल; तर अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी चालढकल..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-पोलीस ठाण्यात
आमच्या सारख्या सुशिक्षित माणसाच्या चुट्टीवरून हात फिरवल्या जात असेल,तर जे अशिक्षित व पोलीस स्टेशनची पायरी चढण्यास घाबरतात, अश्यांच्या बाबतीत काय घडत असेल? ही कल्पनाच न केलेली बरी.एखाद्या अधिकारी,कर्मचाऱ्याने  सर्वसामान्य नागरिकाची तक्रार केली तर सर्वसामान्य नागरिकांवर पटकन गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र,सर्वसामान्य नागरिकाने एखाद्या अधिकारी, कर्मचाऱ्याची तक्रार केली तर गुन्हे दाखल करण्याचा प्रश्न तर सोडाच साधी दिलेल्या तक्रारीची चौकशीही केली जात नसल्याचा प्रकार हल्ली देसाईगंज पोलीस ठाण्यात उघडकीस येऊ लागला आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर पटकन गुन्हे दाखल; तर अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी चालढकल..! असे केले जात असल्याने पोलीस अधीक्षक(एसपी)साहेब लक्ष द्या हो.! अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
सार्वजनिक हिताचा मुद्दा उचलून धरत कोट्यवधी रुपयांचे अवैध वाळू उत्खनन व चोरी प्रकरणी ८० दिवस आंदोलन करूनही प्रशासनाने चालढकल करून ‘आम्ही करू ती पूर्व दिशा’ असे ठरविल्याने देसाईगंज पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात सत्यवान रामटेके व नामदेव वसाके यांनी दिलेल्या तक्रारीत सखोल चौकशी करून आपल्या स्तरावरून कारवाई करण्यासंबंधाने तीन महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती.त्यामध्ये गडचिरोली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीचे संदर्भ टाकण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.अश्यातच तीन महिने लोटूनही कारवाई शून्यच.उलट देसाईगंज पोलीस ठाण्यातून समज पत्र देऊन याबाबतीत जिल्हाधिकारीच कारवाई करू शकतात,अशी बतावणी करण्यात येत आहे. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना वाटतेय की, समोरच्या व्यक्तीला काहीही समजत नाही,समोरील व्यक्ती हा अळाणी आहे,असा त्यांचा समज असावा. एखादा व्यक्ती हा पोलीस ठाण्यात तक्रार केव्हा करतो, ज्यावेळी अश्या व्यक्तीवर अन्याय झालेला असतो व सगळे दार बंद होत असतात.मात्र,जे दार खटखटवल्या जातेय,असेही दार बंद होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करावे?असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रत्येक व्यक्ती हा न्यायालयाच्या पायऱ्या चढू शकत नाही.न्यायालयाच्या पायऱ्या चढण्यापूर्वी इतर विभाग कशासाठी? देखावे करण्यासाठीच आहेत की काय?अश्यांना आवर घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.त्यामुळे याबाबत गडचिरोली जिल्हा पोलिस अधिक्षक(एसपी)नीलोत्पल यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!