Sunday, May 31, 2026
Homeपुणेएसडीओ अडकला एसीबीच्या जाळ्यात; दोन लाख रुपये घेतांना रंगेहाथ अटक..

एसडीओ अडकला एसीबीच्या जाळ्यात; दोन लाख रुपये घेतांना रंगेहाथ अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-जिल्ह्याच्या आंबेगाव तालुकांतर्गत येणाऱ्या जुन्नर-आंबेगाव-मंचर उपविभागाचे एसडीओ म्हणजेच उपविभागीय अधिकारी यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)पथकाने रंगेहाथ अटक केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची कारवाई पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज,शुक्रवार २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजून ३ मिनिटांनी उपविभागीय कार्यालयात केली.गोविंद पंढरीनाथ शिंदे वय ४६ वर्षे, पद-उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी,जुन्नर -आंबेगाव उपविभाग,मंचर, ता.आंबेगाव,जि.पुणे,पत्ता-परिसर अपार्टमेंट,फ्लॅट न.१२०१,डॉ.केतकर लेन,प्रभात रोड,डेक्कन,पुणे,मुळ पत्ता-सोनारी,ता.सिन्नर,जि.नाशिक असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,यातील ४८ वर्षीय तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून ते एका भागीदारी कंपनीचे एक भागीदार आहेत.नमूद बांधकाम कंपनीने इमारत बांधण्यासाठीच्या लागणाऱ्या सर्व शासकीय विभागाच्या परवानग्या, इमारत पूर्ण झाल्यावर पूर्णत्व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे तसेच त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे शासकीय शुल्क भरणा करण्याचे सर्व अधिकार तक्रारदार यांना दिलेले आहेत.सदर भागीदारी कंपनीने पुणे-नाशिक महामार्ग लगत नारायणगाव येथे जॉइंट व्हेंचर(Joint Venture)मध्ये डेव्हलपमेंट (development)साठी घेतलेल्या प्लॉटवर इमारतीचे बांधकाम सुरू केले होते.सदर इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने अंशतः पूर्णत्वाचा दाखला मिळण्याकरता उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.त्यानंतर तो प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांनी नगर रचना विभागाकडे पाठवून त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून स्वतःकडे प्रस्ताव राखून ठेवला होता.२० मार्च २०२६ रोजी सदर प्रस्तावाबाबत तक्रारदार हे चौकशी करण्यासाठी गेले असता उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी तक्रारदाराने बांधलेल्या इमारतीसाठी अंशतः पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्याकरिता तक्रारदाराकडे ५ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी २४ मार्च २०२६ रोजी अँटी करप्शन ब्यूरो पुणे येथे दिली होती.तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज,शुक्रवार २७ मार्च रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीदरम्यान उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी तक्रारदार यांचे अर्जाप्रमाणे त्यांनी बांधलेल्या इमारतीस अंशतः पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मंजुर करून त्या मोबदल्यात तक्रारदाराकडे २ लाख रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पडताळणी कारवाई झाल्यानंतर सापळा कारवाईदरम्यान गोविंद शिंदे, उपविभागीय अधिकारी,जुन्नर-आंबेगाव यांना उपविभागीय कार्यालय मंचर या त्यांच्या शासकीय कार्यालयात आज शुक्रवारी ३:०३ वाजता तक्रारदार यांचेकडून २ लाख रुपये लाच रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले.प्रकरणी आरोपी उपविभागीय अधिकारी शिंदे विरुद्ध मंचर पोलीस ठाणे,पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,ला.प्र.वि.पुणे परिक्षेत्र,पुणे व अप्पर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, ला.प्र.वि.पुणे,अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले,ला.प्र.वि.पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम(एजंट)हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन शिरीष सरदेशपांडे,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.पुणे (मो.क्र.9823167154)तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अजीत पाटील,ला.प्र.वि.पुणे (मो.क्र.9029030530) यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!