- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून नुकतेच २३ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६ याकालावधीत घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणामध्ये विधवा,घटस्फोटीत,परितक्त्या तसेच अविवाहित या प्रकारातील माता-भगिनींचा समावेश आहे.देसाईगंज शहरातील संबंधित एकल महिलांची आवश्यक माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते.या सर्वेक्षणामध्ये एकल महिलांनी दिलेल्या माहितीनुसार आधार क्रमांक, शिक्षण,उदरनिर्वाहाचे साधन,मासिक उत्पन्न,एकल महिला दिव्यांग आहे काय?कुटूंबातील सदस्यांची संख्या १८ वर्षाखालील,कुटूंब दारिद्र्यरेषेखालील आहे का? बचतगटाची सदस्य आहे का?शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे का?असल्यास योजनांची नांवे आदी माहिती गोळा करण्यात आलेली आहे.मात्र,या सर्वेक्षणातून काही एकल माता-भगिनी सुटण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने त्यांना सुध्दा सर्वेक्षणात आपली नावे समाविष्ट करता यावीत.याकरीता येत्या,७ सप्टेंबर २०२६ पर्यंत संधी देण्यात आली आहे. त्यामुळे,ज्या एकल महिलांची अद्याप नोंदणी झालेली नाही वा सर्वेक्षणात ज्यांचे नाव सुटलेले असतील,अश्या एकल महिलांनी देसाईगंज नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रत्यक्ष भेट देऊन नोंदणी करुन घ्यावी.जेणेकरुन कोणतीही पात्र महिला भगीनी या सर्वेक्षणापासुन वंचित राहू नये.अधिक माहितीकरीता महिला व बाल विकास विभाग नगरपरिषद देसाईगंज येथे संपर्क साधावा,असे आवाहन नगरपरिषद देसाईगंच्या वतीने मुख्याधिकारी सतिश चौधरी यांनी केले आहे.
- Advertisement -

