उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- तुमसर शहर व उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीमेत कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता तुमसर शहरातील १७ जणांवर हद्दपारची कारवाई प्रस्तावित करण्यात अली आहे. यात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाने संबंधितांना नोटीस बजावले आहेत, यात दखलपात्र गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगार गुंड प्रवृत्तीचे असल्याचे कारण दिले आहे.
मुंबई पोलिस कायदा सन १९५१ चे कलम ५९ (१) अन्वये हे नोटीस बजाविण्यात आले आहे.नोटीस बजाविण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्याविरुद्ध गुन्हे संबंधात लेखी स्वरूपात स्पष्टीकरण सादर करून बचाव करण्याच्या दृष्टीने लेखी व समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात व गावात वातावरण शांतता भंग करणे, तसेच गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगारांसोबत राहून शस्त्र बाळगणे, लोकांना धमक्या देऊन जनतेत दहशत निर्माण करणे, आदी कारणे देण्यात आली आहेत.इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच हद्दपारचे आदेश पोलिस विभागाने काढले असून,त्यात तुमसर येथील व्यक्तींचा समावेश अधिक आहे.बनावट रॉयल्टी वापरून रेती चोरी करणे या गुन्ह्याचा समावेश हद्दपारिकरिता गृहीत धरण्यात आला आहे.
तुमसर व मोहाडी तालुक्यात रेती चोरी करणे,चोरीची रायल्टी वापरणे हा येथे शिष्टाचार समजला जातो. त्यामुळे ही कारवाई राजकीय दबावातून तर करण्यात आली नाही ना..! अशी चर्चा सध्या तुमसर व मोहाडी तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलिसांनी घेतलेला असामाजिक तत्त्वावर हद्दपारीचा निर्णय निश्चितच घ्यावा; परंतु त्यातही पारदर्शकपणा असण्याची गरज आहे.अन्यथा ‘आम्ही करू ती पूर्वदिशा’ असे व्हायला नको.

