Wednesday, October 7, 2026
Homeभंडाराईव्हीएम हटाव,देश बचाव', 'बॅलेट पेपर जिंदाबाद, ईव्हीएम मुर्दाबाद' म्हणत काढली प्रतीकात्मक प्रेतयात्रा..

ईव्हीएम हटाव,देश बचाव’, ‘बॅलेट पेपर जिंदाबाद, ईव्हीएम मुर्दाबाद’ म्हणत काढली प्रतीकात्मक प्रेतयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशिनवर उमेदवाराचे नावच गायब झाल्याने एकच धांदल उडाली होती.भंडारा नगर परिषदेत सुरवातीच्या दोन प्रभागांची मतमोजणी सुरळीत पार पडली.तिसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू होताच प्रभाग ३ ‘अ’ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नावच ईव्हीएममध्ये नसल्याचे दिसून आले.यामुळे गोंधळ उडाला.संपूर्ण १७ प्रभागांची मतमोजणी संपल्यानंतर प्रभाग ३ ‘अ’ची मतमोजणी करण्यात आली.प्रभाग क्र.३ ‘अ’ मध्ये एकूण ५ उमेदवार व १ नोटा असे ६ पर्याय असणे आवश्यक असतांना मतदान यंत्र तयार करतांना उमेदवार क्र.५ आणि ६ (नोटा)ची नावे झाकली गेली होती.त्यामुळे प्रत्यक्ष मतदान केवळ ४ उमेदवारांसाठीच उपलब्ध करून देण्यात आले.विशेष म्हणजे,मतमोजणी दरम्यान ही गंभीर तांत्रिक चूक निदर्शनास आल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी संबंधित केंद्रातील सर्व सात अधिकारी,कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले.अश्यातच भंडारा जिल्ह्यात ईव्हीएमवर झालेली निवडणूक रद्द करा,सर्व निवडणुका नव्याने बॅलेट पेपरवर घ्या,केवळ कर्मचाऱ्यांचे निलंबन न करता जबाबदार अधिकाऱ्यांनाही निलंबित करा आणि मागण्यांवर १० दिवसांत निर्णय घ्या,अश्या मागण्यांचे निवेदन घेऊन जिल्हाभरातून एकवटलेल्या पराभूत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी व नेत्यांनी भंडारा शहरात ईव्हीएम हटाव,देश बचाव’, ‘बॅलेट पेपर जिंदाबाद, ईव्हीएम मुर्दाबाद’ अशा जोशपूर्ण घोषणा देत  ईव्हीएमची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली.दसरा मैदानावरून या निषेध मोर्चाला प्रारंभ झाला. सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजक राष्ट्रवादी(शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे होते. यात शिंदेसेना नेते आमदार नरेंद्र भोंडेकर,माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गायधने, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय रेहपाढे,आपचे जिल्हाध्यक्ष चंचल साळवे,वंचितचे जिल्हाध्यक्ष शेषराव रामटेके,नगराध्यक्षपदाच्या पराभूत उमेदवार जयश्री बोरकर,डॉ.अश्विनी भौडेकर,सुषमा साखरकर,माधुरी चौधरी यांच्यासह अनेक उमेदवार तसेच राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.गांधी चौक, बसस्थानक मार्गे त्रिमूर्ती चौकात मोर्चा पोहोचल्यावर जाहीर सभेत रूपांतर झाले.जिल्हाधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी आणि मागण्या पूर्ण कराव्या.अन्यथा पुढील १० दिवसांत जिल्हा बंद केला जाईल व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!