Thursday, April 30, 2026
Homeदेसाईगंजआरमोरीत दुकान फोड्या तर देसाईगंजात अवैध गौण खनिज चोऱ्या..! - गौण खनिज...

आरमोरीत दुकान फोड्या तर देसाईगंजात अवैध गौण खनिज चोऱ्या..! – गौण खनिज चोरीसाठी महिन्याकाठी हप्ताच नाही तर एंट्री पासिंगसाठी पैश्याचे पाकिटे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 
देसाईगंज(गडचिरोली):-जितका पॉश एरिया तितकाच अवैध धंद्यांना ऊत,हल्ली ‘जोरो-शोरोसे’ सुरू असलेले चित्र पाहता संबंधित विभागांच्या आशिर्वादानेच अवैध धंदे उदयास आल्याचे  निदर्शनास येऊ लागले आहे. अशातच मागील काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दुकान फोड्या करीत हजारो ते लाखो रुपयांच्या चोऱ्या करून ‘हम नही मिलेंगे’ असे केले आहे.तर देसाईगंज शहरासह तालुक्यात गौण खनिज चोरांचा सुळसुळाट होऊन ‘हम नही छोडेंगे’ असे म्हणीत चोरांसह संबंधित विभागांच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी ‘माल सुतावो’ अशी भूमिका घेतल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.
देसाईगंज शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात हल्ली मोठ्या प्रमाणावर गौण खनिजांच्या चोऱ्या केल्या जात आहेत.त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांना चुना लावल्या जात आहे.त्यात आणखी भर पडून काही विभागाचे अधिकारी,कर्मचारी संगनमत करून अवैध गौण खनिजाचे पकडलेले साधने पैश्याच्या हव्यासापोटी सोडून देऊ लागले आहेत.असे अधिकारी,कर्मचारी केवळ नामधारी,देखाव्यासाठी कारवाई करतांना दिसून येऊ लागल्याने इतरांना काहीच कळत नाही; असे भासवू लागले आहेत. काहींच्या मते,दिवस-रात्रो अवैध गौण खनिजांची चोरी अशीच केली जात नाही; तर काहींना अवैध चोरीचे गौण खनिज खुलेआम वाहतुकीसाठी महिन्याकाठी हप्ता दिला जातो.तर एका संबंधित विभागास एंट्री पासिंगसाठी पैश्याचे पाकिटे वाटप करण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा,कुरुड,आमगाव, सावंगी,कोकडी व इतर गावांतून दिवसाढवळ्या तसेच रात्री मुख्य रस्त्यांसह चोरट्या मार्गाने टीप्पर,ट्रॅक्टर व इतर गौण खनिज भरलेली वाहने धाऊ लागली आहेत. अशातच गावातील तसेच रत्यांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अवैध गौण खनिज भरलेली वाहने दिसू लागली आहेत; मात्र,संबंधित विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अशी वाहने दिसूनही न दिसण्यासारखे करणे म्हणजे टेबलाच्या खालून झांगडगुत्ता करणे होय; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.काहीजण पैश्याच्या हव्यासापोटी मुके झाल्याने अशा मुक्यांना वाचा फोडणार तरी कोण? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!