- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंधळी येथे आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी माजी सरपंचा उज्वला रायसिडाम,माजी उपसरपंच अप्रव भैसारे,माजी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी पुसाम,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जितेंद्र कऱ्हाडे,काँग्रेस बूथ प्रमुख भास्कर पुसाम,काँग्रेसचे राजकुमार जनबंधू,महागू भानारकर, राजू बोदेले तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद तथा विद्यार्थी उपस्थित होते. आमदार मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा,या उद्देशाने सदरचा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

