Thursday, August 27, 2026
Homeदेसाईगंजआमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते बुद्ध विहाराच्या सभामंडपाचे भुमिपुजन…-सभामंडप बंधकामाकरिता २० लक्ष रुपयाच्या...

आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते बुद्ध विहाराच्या सभामंडपाचे भुमिपुजन…-सभामंडप बंधकामाकरिता २० लक्ष रुपयाच्या निधिची तरतुद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंजच्या जुनी वडसा वार्डातिल संबोधी बुद्ध विहाराच्या अतिरिक्त सभामंडपाच्या बांधकामाचे भुमिपुजन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते पार पडले या प्रसंगी जेष्ठ नागरिक अशोक बोदेले, परसराम राऊत,भाजपा देसाईगंज शहराध्यक्ष सचिन खरकाटे,राजरतन मेश्राम,दिपक सहारे,माजी नगर सेविका अश्विनी कांबळे,वंदना सहारे,दिलिप उके, ताजुल उके,अविनाश बोदेले,मालता राऊत,मंदा शिंपोलकर यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी समाज बांधवांशी हितगुज करतांना कृष्णा गजबे म्हणाले की,जुनी वडसा येथील संबोधी बुद्ध विहारालगत सभामंडपाची मागणी बऱ्याच दिवसांपासुन होती; मात्र निवडणूक आचार संहितेमुळे या कामाला थोडा विलंब झाला.धार्मीक प्रकार्य पार पाडण्याच्या हेतुने बौद्ध विहाराला सभामंडप अत्यावश्यक असल्याने निवडनुक आचार संहिता संपताच; मी या कामाकरिता दोन टप्यात २० लक्ष रुपये निधीची तरतुद करुन दिली असुन या बांधकामामुळे बौद्ध धम्माचे सांस्कृतिक व धार्मिक प्रकार्य पार पाडण्यात निश्चितच मदत होईल,असे त्यांनी सांगितले.कंत्राटदाराने लवकरात-लवकर सदरची वास्तु दर्जेदार पद्धतिने बांधकाम करावी; निधीची कमतरता पडल्यास मी आपला सेवक म्हणून सदैव आपल्या पाठिशी उभा राहीन; अशी ग्वाही या प्रसंगी दिली.सभामंडप बंधकामाकरिता २० लक्ष रुपयाच्या निधिची तरतुद करुन दिल्या बद्दल जुनी वडसा येथील समाज बांधवांनी आमदार कृष्णा गजबे यांचे आभार मानले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!