- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण यातना भोगत कृत्रिम यंत्रणेवर जगण्यापेक्षा शांतपणे मरण यावे,यासाठी इच्छामरणाची परवानगी आवश्यक असते.इच्छामरणामध्ये संबंधित गंभीर रुग्णाला देण्यात येत असलेला कृत्रिम श्वासोच्छ्वास (व्हेंटिलेटर)अथवा अन्य प्रकारची जीवनरक्षक प्रणाली वैद्यकीय निकषांच्या आधारे बंद केली जाते आणि त्या व्यक्तीला नैसर्गिक मृत्यूकडे नेले जाते.अशा अत्यंत संवेदनशील प्रकरणांमध्ये तातडीने आणि योग्य निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये विशेष वैद्यकीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या संदर्भात आज,शुक्रवार १७ जुलै रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून शासन निर्णय (जीआर)जारी करण्यात आला आहे.
पंजाब मधील हरीश राणा मागील १३ वर्षांपासून अत्यंत वेदनादायी व गंभीर आजारी अवस्थेत होता.जिथे स्वतःची कोणतीही भावना किंवा वेदना व्यक्त करू शकत नव्हता.सर्वोच्च न्यायालयाने ११ मार्च २०२६ रोजी दिलेल्या इच्छामरणाच्या ऐतिहासिक निकालात,रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्याचे कृत्रिम अन्न,पाणी व औषधोपचार थांबवण्यास मंजुरी दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला एम्स(AIIMS), दिल्ली येथे दाखल करण्यात आले,जिथे २४ मार्च २०२६ रोजी उपचारांची प्रणाली काढून घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.सदर प्रकरणी न्यायालयाने “कॉमन कॉज” खटल्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा दाखला देत,जेव्हा एखादा रुग्ण गंभीर परिस्थितीत असतो आणि त्याच्या “लिव्हिंग विल”(Advance directives)नुसार उपचार थांबविण्याची वेळ येते तेव्हा प्राथमिक वैद्यकीय मंडळ व दुय्यम वैद्यकीय मंडळांची मंजुरी आवश्यक आहे.हरीश राणाच्या कायदेशीर प्रक्रियेत अनेक वर्षे गेल्याने भविष्यात अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यासाठी विनाविलंब एक निश्चित कार्यपद्धती असावी,असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.त्यानुसार,आता महाराष्ट्राने पाऊल उचलत या वैद्यकीय समित्यांच्या स्थापनेचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार,शासकीय रुग्णालयांमध्ये सदर प्रकरणी पुढीलप्रमाणे मंडळांची रचना करण्यात आली आहे.
- प्राथमिक वैद्यकीय मंडळ/समिती👇
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक-अध्यक्ष
वैद्यकीय अधिकारी वर्ग-२(बधिरीकरण)-सदस्य
वैद्यकीय अधिकारी वर्ग-२(शल्य चिकित्सक)-सदस्य
वैद्यकीय अधिकारी वर्ग-२(भिषक)-सदस्य सचिव
- द्वितीय वैद्यकीय मंडळ/समिती👇
जिल्हा शल्य चिकित्सक-अध्यक्ष
वैद्यकीय अधिकारी वर्ग-२(बधिरीकरण)-सदस्य
वैद्यकीय अधिकारी वर्ग-२(शल्य चिकित्सक)-सदस्य
वैद्यकीय अधिकारी वर्ग-२(भिषक)-सदस्य सचिव
खाजगी रुग्णालयांमधील “लिव्हिंग विल” संबंधि प्रकरणे हाताळण्यासाठी पुढीलप्रमाणे प्राथमिक व दुय्यम वैद्यकीय मंडळांची रचना निश्चित करण्यात येत आहे.
- प्राथमिक वैद्यकीय मंडळ/समिती👇
याबाबतची रचना रुग्ण दाखल असलेल्या खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)/वैद्यकीय अधीक्षक यांच्याद्वारे केली जाईल.
प्राथमिक वैद्यकीय मंडळ/समिती
संबंधीत रुग्णालयाचे प्रशासक-अध्यक्ष
उपचार करणारे वैद्यकीय तज्ञ-सदस्य
गंभीर आजार उपचार तज्ञ(Critical Care Specialist)-सदस्य
वरिष्ठ फिजिशियन किंवा सर्जन-सदस्य
- द्वितीय वैद्यकीय मंडळ/समिती👇
याबाबतची रचना रुग्ण दाखल असलेल्या खाजगी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याद्वारे केली जाईल.मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळून उर्वरीत जिल्हयांसाठी सदरची समिती राहील.मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयामध्ये वैद्यकीय अधीक्षक,जे.जे. रुग्णालय हे सदर समितीचे सदस्य राहतील.
द्वितीय वैद्यकीय मंडळ/समिती
संबंधीत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक-अध्यक्ष
उपचार करणारे वैद्यकीय तज्ञ-सदस्य
संबंधीत विषयातील तज्ञ २(५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव)-सदस्य
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नामनिर्देशित केलेले सूचीबद्ध बाह्य विशेषज्ञ-सदस्य
जिल्हा शल्यचिकित्सक-सदस्य
द्वितीय वैद्यकीय मंडळावर विशेज्ञ नामनिर्देशित करण्याच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधित जिल्ह्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचे पॅनेल तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
- Advertisement -

