- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी सोमवार,२५ मे २०२६ रोजी राज्यातील धडाधडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे विराजमान होताच मुंढे यांनी कारवाईचा सपाटा सुरू करून मुंबई,नवी मुंबई,पुणे,कोल्हापूर,सांगली,सातारा, नाशिक, बीड,जालना,नांदेड,परभणी,सोलापूर,छत्रपती संभाजीनगर,अमरावती,अकोला,वाशिम,नागपूरसह अनेक जिल्ह्यांतील विविध आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत गूळ,खवा,बुंदी लाडू,बेकरी पदार्थ,कँडी,खाद्यतेल,तूप,खजूर,आईस्क्रीम,फ्रोजन डेझर्ट,मसाले,शेंगदाणा चिक्की आदी पदार्थांची तपासणी केली होती.या कारवाईत तब्बल ८४ हजार ३३५ किलो संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला.या जप्त मालाची किंमत सुमारे ९७ लाख १९ हजार ९६३ रुपये असून संशयित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवले गेले आहेत.त्याचबरोबर,पुण्यात ३ ठिकाणी गुळामध्ये साखरेची भेसळ आढळली आहे. त्यामुळे गुळाचा १५ हजार ९६ किलो साठा जप्त करण्यात आला आहे.तसेच नवी मुंबईत आंबा विक्रीसाठी रासायनिक द्रव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आले आहे.यामध्ये २९ लाख २२ हजार ५७० रुपये किंमतीचे आंबे जप्त करण्यात आले आहेत.काही ठिकाणी अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारे पॅकिंग उघड करण्यात आले आहेत. अश्यातच तुकाराम मुंडे आता ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि खोटे दावे करणाऱ्या जाहिरातींवर अधिक कडक कारवाई करणार आहेत.चुकीची माहिती देणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी कलाकारांवरही कारवाई केली जाईल.ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या जाहिरातींमुळे अनेक नागरिक आर्थिक नुकसान सोसतात.काही कंपन्या उत्पादनांबाबत दिशाभूल करणारे दावे करून ग्राहकांना आकर्षित करतात.अशा जाहिरातींमध्ये प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग असल्याने ग्राहकांचा विश्वास अधिक वाढतो.त्यामुळे अशा जाहिरातींची जबाबदारी केवळ कंपन्यांवरच नव्हे तर त्यांचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींवरही निश्चित केली जाणार आहे.ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुंढे यांनी नमूद केले.डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याची माहिती तपासून पाहावी आणि संशयास्पद जाहिरातींबाबत संबंधित यंत्रणांकडे तक्रार करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
- Advertisement -

